दि.१० रोजी, संत परीक्षक गोरोबा काका मंदिर लोकार्पण तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठा सह कलशारोहण, वास्तुशांती सोहळा आयोजन
श्रीगोंदा,दि. ७ एप्रिल २०२५ : तालुक्यातील कोळगाव येथे श्री. विठ्ठल रुक्मिणी तसेच संत परीक्षक श्री गोरोबा काका मूर्ती प्राणप्रतिष्ठा सह कलशारोहण तसेच मंदिर लोकार्पण कार्यक्रमाचे गुरुवार दि.१० जुलै रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी सैनिक नंदकुमार चंदन यांनी दिली.
मिती चैत्र १३ शके १९४६ गुरुवार दि.१० रोजी, दुपारी कोळगाव येथे संत परीक्षक गोरोबा काका मंदिर लोकार्पण तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठा सह कलशारोहण, वास्तुशांती सोहळा आयोजित केला असून निमित्ताने ह.भ.प. संदीपान महाराज तनपुरे यांचा हरिजागर तर ह.भ.प.लक्ष्मण महाराज पाटील आळंदी देवाची यांचे कीर्तनसेवेचे आयोजन केले आहे.
सकाळी श्री. विठ्ठल रुक्मिणी व संत परीक्षक गोरोबा काका मूर्ती मिरवणूक, सकाळी १० वाजता प्रतिमा पूजन, होम हवन, नवग्रह पूजा दुपारी १२ वाजता बालब्रम्हचारी योगी श्री तेजनाथजी महाराज यांच्या हस्ते कलश प्रतिष्ठापना, मूर्ती स्थापना व मंदिर लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने कुंभार बांधव उपस्थित होते.