विकासकामांना व जीर्णोध्दारासाठी आमचा विरोध नाही – आमीन शेख

श्रीगोंदा, दि. १९ एप्रिल २०२५ : शेख महंमद बाबा देवस्थान जिर्णोधारास आमचा कधी विरोध नव्हता व नाही, सन १९८० साली मा.आ. बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून देवस्थान शुभोभीकरणाचे काम करण्यात आले. त्या नंतर राहुल जगताप आमदार असताना त्यांनी शेख महंमद बाबा देवस्थान च्या आत पेव्हिंग ब्लॉक व हायमॅक्स दिवा बसविण्यात आला. त्यानंतर मा. खा. सुजय विखे पा.व मा. मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून देवस्थानाच्या सुशोभिकरणासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. या निधितून बाहेरील पटागंणात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले. व आत मध्ये विविध विकास कामे करण्यात आले. तसेच लोक वगर्णीतुन देखील ट्रस्ट च्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात आले. आम्ही कधीही विकास कामास विरोध केला नाही. आम्ही देवस्थान जिर्णोधार विकास कामास विरोध करत आहोत हा आरोप खोटा आहे. तसेच शेख महंमद बाबा यांच्या समाधीवर दररोज अर्पण करण्यात येणार शेरा व दर गुरुवारी होणारे अन्नदानास आम्ही विरोध केला हा आरोप देखील खोटा असल्याचे ट्रस्ट चे अध्यक्ष, बाबांचे वंशज आमीन शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

दि.१६ रोजी शेख महंमद बाबा देवस्थान जिर्णोधार होणे कामी श्रीगोंदा तहसिल कार्यालयात आमदार विक्रमसिंह पाचपुते व प्रशासकीय अधिकारी पोलीस उपअधिक्षक मिलिंद वाखारे, प्रातांधिकारी श्रीनिवास चिंचकर, पोलीस निरिक्षक किरण शिंदे, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत मॅडम, नायब तहसिलदार नेवसे या प्रशासकीय अधिकाऱ्यां सोबत आमची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट च्या नावात बदल करुन शेख महंमद बुवा देवस्थान करावे अशी सुचना आम्हाला करण्यात आली ही सुचना आम्ही मान्य केली. २) देवस्थान जिर्णोधार काम करण्यासाठी ट्रस्ट च्या मान्यतेने एक शासकीय समिती स्थापन करावी लागेल त्याकामी ट्रस्ट ची नाहरकत द्यावी लागेल, या शासकीय समितीत विद्यमान आमदार, तहसिलदार, पोलीस निरिक्षक, नगरपरीषद मुख्याधिकारी, सार्वजनीक बांधकाम उप अभियंता, ट्रस्ट च्या वतीन व यात्रा कमेटीच्या वतीने एक-एक सदस्स राहील असे एकुण सात सदस्याची समिती राहील. ही समीती स्थापण करण्यासाठी ट्रस्ट च्या वतीने बैठकीत मान्यता देण्यात आली. ३) शेख महंमद बाबा यांचे वंशज, पुजारी यांची निवासस्थाने देवस्थानच्या जागेतच बांधुन देण्यात येईल. ४) कोर्टात देवस्थानच्या बाबत असलेले सर्व दावे ट्रस्ट मागे घ्यावीत व यात्रा कमेटीच्या वतीने देखील कोर्टात असलेले दावे माघे घेण्यात येईल असे बैठकीत ठरवण्यात आले. परंतू बैठकीत ठरवण्यात आलेले विषय यात्रा कमेटीस मान्य नसल्याने समजते.

शेख महंमद बाबा ट्रस्ट ची सत्य परिस्थित अशी आहे की,

१) गोपाळ मोटे वगैरे यांनी सन १९५३ साली झालेला ट्रस्ट रद्द करुण मोटे वगैरे यांची नियुक्ती करावी म्हणून मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त अ.नगर यांच्या कडे दि.२६/३/१९९६ रोजी ४/९६ अर्ज दाखल केला होता. गोपळ मोटे यांचा ४/९६ अर्ज मा. धर्मादाय आयुक्त अ.नगर यांनी दि.३/५/९९ रोजी फेटाळून लावला.

२) शेख महंमद बाबा यांचे वंशज विश्वस्त मंलग बुवा हाफी ज बुवा, हुसेन कमाल बुवा, नबीलाल बाबा यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त अ.नगर यांच्या कडे स्किम अर्ज क्र.४/९७ दि.३०/१२/९६ रोजी दाखल केला.
सदर स्किम अर्ज क्र. ४/९७ मा. धर्मादाय आयुक्त अ.नगर यांनी दि.२९/११/९९ रोजी मंजुर केला.

३) अर्ज ४/९६ वरील धर्मादाय आयुक्त यांच्या निर्णया विरुद्ध गोपाळ मोटे वगैरे यांनी अ.नगर जिल्हा कोर्टात १/२०१२ ट्रस्ट अपील दाखल केले. सदर ट्रस्ट अपील क्र.१/२०१२ अपील मा. जिल्हा न्यायालयाने दि.४/७/२०१९ रोजी रद्द करत फेटाळून लावले.

४) स्किम अर्ज क्र.४/९७ वरील धर्मादाय आयुक्त यांच्या निर्णया विरुद्ध गोपाळ मोटे वगैरे यांनी अ. नगर जिल्हा कोर्टात २/२०१२ ट्रस्ट अपील दाखल केलेसदर ट्रस्ट अपील क्र. २/२०१२ अपील मा. जिल्हा न्यायालयाने दि.४/७/२०१९ रोजी रद्द करत फेटाळून लावले.

५) गोपाळ मोटे वगैरे, यात्रा कमिटीने यांनी श्री. संत शेख महंमद महाराज देवस्थान उत्सव प्रतिष्ठाण, श्रीगोंदा नोंदणीसाठी अर्ज क्र.६/२००३ मा. धर्मादाय आयुक्त अ.नगर यांच्या कडे दि.७/१/२००३ रोजी दाखल केला.सदर ६/२००३ चौकशी अर्ज मा. धार्मदाय आयुक्त अ.नगर यांनी दि.४/१०/२०१४ रोजी रद्द करुत फेटाळून लावला.

६) सन २००८ साली गाव बंद ठेवून गोपाळ मोटे वगैरे यांनी आमच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलीस खोटा गुन्हा दाखल केला, या खोट्या गुन्ह्यातून मा. न्यायालय श्रीगोंदा यांनी आमची दि. ०२/०८/२०२२ रोजी निर्दोष मुक्तता केली.

७) सन २००८ मध्ये गोपाळ मोटे वगैरे यांनी आमचे राहते घरातील सामान बाहेर फेकुण देत आम्हाला आमच्या घरातून हुसकावून लावले त्या विरुद्ध आम्ही श्रीगोंदा येथील मे. सिव्हिल जज्ज साहेब सिनियर डिव्हीजन वरीष्ट स्तर यांच्या कोर्टात रे.मु.न. १५४/०९ दावा दाखल केला. रे.मु.न.१५४/०९ दावा मध्ये गोपाळ मोटे वगैरे यांनी आमच्या देवस्थान, मिळकतीत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करु असा दि.११/०२/२०१० मनाई आदेश दिला आहे. तो कायद आजही कायम आहे.

८) सन २०११ मध्ये गोपाळे मोटे वेगैरे यांनी शेख महंमद बाबा देवस्थान परिसरात आम्ही अतिक्रमण केले आहे. ते नगरपेरीषदे मार्फत काढून टाकण्यासाठी गोपाळ मोटे वेगैरे श्रीगोंदा तहसिल कार्यालया समोर उपोषणास बसले होते.या विरुद्ध आम्ही न्याय मागण्यासाठी श्रीगोंदा केर्टात केस नं. २३२/११ दाखल केली या केस मध्ये मा. न्यायालयाचे श्रीगोंदा नगरपरिषदे मनाई आदेश पारीत केला आहे.

९) सन २०२२ गोपाळे मोटे वगैरे यांनी शेख महंमद बाबा ट्रस्ट च्या नावाशी साधर्म असलेली श्री संत शेख महंमद महाराज देवस्थान याव उत्वस प्रतिष्ठाण, श्रीगोंदा यानावाने एफ अर्तगत सामाजीक संस्था नोंदणी केली. या समाजीक संस्थेचा शेख महंमद बाबा देवस्थाना चा कसलाही कायदेशीर संबध नाही, तसेच या प्रतिष्ठाण च्या विरोधात पुणे येथील मा. धर्मादाय आयुक्त साहेब यांच्या कोर्टात केस चालू आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजी राजे भोसले यांनी सुमारे ५०० वर्षा पुर्वी शेख महंमद बाबा यांना गुरु मानून (चांभारगोंदे) श्रीगोंदा येथे वंशपरपरेने इनाम जमीन दिली. या जमीनीस कोण हरकत करील तो गुन्हेगार असा स्पष्ट उल्लेख या सनद मध्ये करण्यात आला आहे.

एवढे सर्व कायदेशीर बाबी असतानाही देखील शेख महंमद बाबा देवस्थान चा जिर्णोधार कायदेशीर पद्धतीने सर्वांना बरोबर घेवून करणार असल्याचे शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
22.7 ° C
22.7 °
22.7 °
94 %
2.9kmh
100 %
Sat
22 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!