नवीन नियमानुसार वक्फ ची नोंदणी रद्द करणे कामी जिल्हाधिकारी यांचे कडे प्रकरण दाखल : आमीन शेख

श्रीगोंदा, दि. २२ एप्रिल २०२५ : हिंन्दू मुस्लीम एकतेचे प्रतिक शेख महंमद बाबा देवस्थानच्या विकासजे श्रीगोंदे करांच्या मनात आहेत तसेच होणार आहे. गेली दोन-तीन दिवसापासून वक्फ बाबत जी भिती पसरवण्यात आली होती ते वक्फ ची नोंदणी रद्द करण्यासाठी शेख महंमद बाबा यांचे वंशज आमीन शेख यांनी आज दि.२२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांचे कडे प्रस्ताव दिला आहे.

काहींनी श्रीगोंद्यात वक्फ बाबत भितीचे वातावरण तयारु करुन आम्हाला व्हिलन करण्याचा प्रयत्न केला, आमच्यावर विविध प्रकारचे खोटे आरोप करण्यात आले. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केलेल्या सुचने नुसार वक्फ ची नोंदणी रद्द करण्याकामी प्रस्ताव दाखल करण्यात आला असुन दि.१६ च्या आ. पाचपुते यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरल्या प्रमाणे शेख महंमद बाबा यांच्या देवस्थानचा विकास करण्यात येणार आहे.

शेख महंमद बाबांच्या भावीक भक्तांच्या भावनेचा आदर करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डी सारखे मोठे तिर्थक्षेत्र होण्यासाठी सर्व श्रीगोंदा वासीयांने सहकार्य करावे असे आवाहन आमीन शेख यांनी केले आहे.

वक्फ बोर्ड कडे का जावे लागले ?

२००८ साली आमच्या कुटुंबाच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करुन आमचे राहते घरातील सामान यात्रा कमेटीने बाहेर फेकून दिले, आमच्या लहान मुले, महिलांना घरातून हुसकावून लावून जिर्णोधाराच्या नावाखाली देवस्थान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यात्रा कमेटीच्या हातून देवस्थान वाचवण्यासाठी आम्ही वक्फ बोर्डा कडे नोंदणी केली. त्या नोंदणीमुळे देवस्थानच्या जागेवर कुणालाही मालकी सांगता येत नाही त्या साठी आम्हाला तिकडे नोंदणी करावी लागली. वक्फ कडे आम्ही नोंदणी केली असल्याचे त्या वेळेसच यात्रा कमेटीला माहिती होती. अशी ही माहिती शेख यांनी दिली.

जेथे शेख महंमद बाबा यांचे देवस्थान आहे ती सुमारे १० एकर आणि लेंडी नाला, मिशन बंगला पाठीमागे असलेली शेख महंमद बाबा यांची इनामी जागा आहे असे तीन्ही मिळनू ३९ एकर जागा आहे.

चौकट १)
लोकांना आमच्या विरुद्ध भडकावून देण्यासाठी असे सांगण्यात आले की, आम्ही तेली गल्ली, शनिचौक, बगाडे कॉर्नर, कुंभार गल्ली येथील लोकांच्या जागेवर वक्फ बोर्डाचे नाव लावले ते साफ खोटे आहे-आमीन शेख

चौकट २)
वक्फ सुधारणा कायद्यानंतर देखील भारतात सर्वात प्रथम जमीन माघारी घेणे व नोंदणी रद्द करणे यासाठी अमीन शेख यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे त्यांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने आभार व सहर्ष स्वागत.
लवकरच ग्रामस्थांच्या सहकार्याने समनव्याने भव्य दिव्य जीर्णोध्दार झालेला दिसेल-टिळक भोस

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25.5 ° C
25.5 °
25.5 °
74 %
10.3kmh
100 %
Sun
25 °
Mon
27 °
Tue
24 °
Wed
25 °
Thu
29 °
error: Content is protected !!