श्रीगोंदा : राष्ट्रीय महामार्ग ५४८डीचे अर्धवट काम : संबंधित अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी सुभान तांबोळी व ग्रामस्थांचे आमरण उपोषण जाहीर

श्रीगोंदा, दि. ६ मे २०२५ : राष्ट्रिय महामार्ग ५४८डी वरील आढळगाव येथील रस्त्याचे अपूर्ण अवस्थेत असलेले काम मागील काही महिन्यांपूर्वी उपोषण करूनही सुरळीत सुरू न झाल्यामुळे या बाबत तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकारी व ठेकेदारांना हे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. तसेच, त्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात अनेक लोकांना अपंगत्व व २० ते २५ लोकांच्या मृत्यूस जबाबदार संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्या वर कायदेशीर कारवाई करून. संबंधित कंपनीला कळ्या यादीत टाकावे.
या साठी सुभान तांबोळी व आढळगावं ग्रामस्थांन च्या वतीने १३-५-२०२५ रोजी सकाळी ११:०० वा. पासून आढळगावं बस स्टँड समोर अमरण उपोषण करण्यात येणार आहे असे निवेदन सुभान तांबोळी यांनी जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर, तहसीलदार श्रीगोंदा यांना दिले आहे. त्यावेळी अरबाज तांबोळी, ईरफान तांबोळी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग ५४८डी वरील आढळगाव ते जामखेड दरम्यानचे काम मागील अनेक महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. यामुळे सामान्य जनतेला गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदर अपूर्ण व निष्काळजी कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे त्या मध्ये सुमारे २०-२५ नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्याच प्रमाणे अपूर्ण साईड गटारांमुळे पाणी साचून अस्वच्छता व साथीचे रोग वाढले आहेत. तसेच धुळीमुळे नागरिकांना व लहान मुलांना श्वसनविकारला सामोरे जावे लागत आहे. परिणामी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ते खोदून ठेवल्या मुळे वाहतूक ठप्प होत आहे व नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी असुविधा निर्माण होत आहे.

दरम्यानच्या काळात १६-१२-२०२४ ते १९-१२-२०२४ या कालावधी मध्ये सुभान तांबोळी व आढळगावं ग्रामस्थांनी ४ दिवस अमरण उपोषण केलें होतें त्या वेळेस उपोषण कर्त्याला लेखी आश्वासन देऊन त्यांची फसवणुक केल्या प्रकरणी संबंधित दोषी आधिकरी व ठेकेदारावर खालील नियमानुसार कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.

BNS कलम 106 (पूर्वीचे IPC 304A): निष्काळजीपणामुळे मृत्यू,BNS कलम 124 व 125 (पूर्वीचे IPC 337 व 338): जखमी व गंभीर जखमी करणे,BNS कलम 281 (पूर्वीचे IPC 283): सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणे,BNS कलम 123 व 124 (पूर्वीचे IPC 269 व 270): संसर्गजन्य रोग पसरवण्याची निष्काळजी कृती,भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988: निधीचा अपव्यय अथवा गैरवापर आढळल्यास,राष्ट्रीय महामार्ग कायदा, 1956: रस्त्याच्या देखभालीच्या जबाबदारीच्या उल्लंघनाबाबत अशा नियमा अंतर्गत संबंधितावर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
28.2 ° C
28.2 °
28.2 °
48 %
8.1kmh
76 %
Wed
28 °
Thu
35 °
Fri
35 °
Sat
35 °
Sun
35 °
error: Content is protected !!