श्रीगोंदा, दि. १९ मे २०२५ : ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टलरीज मध्ये गाळप हंगाम २०२५-२६ करीता ट्रक ट्रॅक्टर जुगाड टायरगाडी व हार्वेस्टर मशीन यांचे तोडणी आणि वाहतुकीचे करार करण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती कारखान्याचे व्यवस्थापक रोहीदास यादव यांनी दिली.
गौरी शुगर या गाळप हंगामासाठी ४०० वाहन टोळी २५० ट्रॅक्टर जुगाड १०० टायर गाडी व १० हार्वेस्टर मशीनचे करार करायचे आहेत जे ऊस वाहुतुकदार वेळेवर करार करतील त्यांना प्राधान्य देण्यात येईल. तरी ऊस वाहतुक दारांनी कारखान्याशी संपर्क साधावा.
मागील गळीत हंगामाप्रमाणे यावर्षी कारखाना पुर्ण क्षमतेने चालून शेतकरी वाहतूकदार व कामगार यांना न्याय देणार आहे. याबाबत कारखाना व्यवस्थापन मंडळाने सर्व तयारी केली आहे
हंगाम सन २०२४-२५ मध्ये गाळप हंगाम यशस्वीपणे करणेसाठी श्रीगोंदा शिरूर कर्जत जामखेड दौंड आष्टी करमाळा मधील ऊस उत्पादक शेतकरी बंधू ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार अधिकारी-कामगार बंधूनी बहुमोल सहकार्य केले आहे. बाबुराव बोत्रेपाटील यांचे मार्गदर्शनाखाली ऊसाला चांगला भाव दिला आहे.
यावेळी कारखान्याचे शेतकी अधिकारी व ऊसपुरवठा अधिकारी सर्व विभागाचे विभाग प्रमुख कर्मचारी तोडणी वाहतूक कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.