श्रीगोंदा : सायबर पोलिसांचे तडफदार कार्य ; श्रीगोंद्यातील तरुणाचा ९२,१७४ रुपयांचा ऑनलाईन फ्रॉड परत मिळवून दिला

श्रीगोंदा, दि. २३ मे २०२५ : ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेत श्रीगोंद्यातील बेलवंडी कोठार येथील ड्रायवर व्यवसाय करणारे सुभाष दत्तात्रय कोठारे (वय ३६) यांचे बँक खात्यातून MOBIKWICK अ‍ॅपचा वापर करून टप्याटप्याने एकूण ९८,९०० रुपये युपीआयद्वारे फसवणूक झाली होती. ही घटना ९ डिसेंबर २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती.

या प्रकरणी कोठारे यांनी सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे तक्रार दाखल केली होती. सदर तक्रार श्रीगोंदा पोलीस स्टेशनकडे पुढील तपासासाठी पाठविण्यात आली होती. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (कर्जत विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वात पोहेकॉ राहुल कारभारी शिंदे व त्यांच्या टीमने तपास सुरू केला.

सदर तपासात सायबर पोलीस स्टेशनच्या मपोका दिपाली घोडके यांची मदत घेण्यात आली. बारकाईने तपास करत असताना ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाकोडे शाखा, जिल्हा कन्नूर (केरळ) येथे होल्ड असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित बँकेशी सातत्याने संपर्क साधून व पत्रव्यवहार करून शेवटी दिनांक १३ मे २०२५ रोजी सुभाष कोठारे यांचे बँक खात्यात ९२,१७४ रुपये परत जमा करण्यात यश आले.

ही कारवाई पोहेकॉ राहुल शिंदे, पोका अरुण पवार, पोहेकॉ महादेव जाधव, मपोकॉ अस्मीता शेळके आणि सायबर पोलीस स्टेशनच्या मपोकॉ दीपा घोडके यांच्या समन्वयातून पार पडली. तक्रारदारांनी या तडफदार कार्यवाहीबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.9 ° C
25.9 °
25.9 °
75 %
5.9kmh
100 %
Sat
27 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
26 °
Wed
28 °
error: Content is protected !!