“ऑनलाइन फसवणुकीचा थरारक पाठपुरावा; श्रीगोंदा पोलिसांनी परत मिळवले ४० हजार!”

श्रीगोंदा (ता. १ जून) : श्रीगोंदा तालुक्यातील एका निवृत्त कर्मचाऱ्याला ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ४० हजार रुपयांची रक्कम परत मिळवण्यात यश मिळवले आहे. पीडित संतोष वसंतराव पवार (वय ४६, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा) यांनी श्रीगोंदा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या खात्यावरून अनोळखी व्यक्तीच्या टार्गेट स्टोअर या वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती.

सदर तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक किरण शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोहेकॉ राहुल कारभारी शिंदे, पोकॉ अरुण पवार, पोकॉ महादेव जाधव, मपोकॉ अस्मिता शेळके, व मपोकॉ अरुणा खेडकर यांच्यासह श्रीगोंदा पो. स्टे. मपोकॉ दीपा घोडके, नेम. सायबर पो. स्टे. अहिल्यानगर यांच्या तांत्रिक पथकाने सखोल तपास केला. त्यांनी केलेल्या तत्परतेमुळे सदर रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लपेटेकाटा, बरबामह बाजार, ए.टी. रोड, ता. बारबारूह, जि. डिब्रुगड येथून परत मिळवण्यात आली.

सदर घटनेत बँकेच्या शाखेशी संपर्क साधून तांत्रिक बाबींची चौकशी करण्यात आली असून सदर रक्कम परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.4 ° C
23.4 °
23.4 °
85 %
7.2kmh
85 %
Sun
23 °
Mon
28 °
Tue
25 °
Wed
26 °
Thu
28 °
error: Content is protected !!