श्रीगोंदा : डॉ. राजेश पाखरे यांचा राज्यस्तरीय आदर्श समाज भूषण पुरस्काराने सन्मान

श्रीगोंदा, दि. ९ जून २०२५ : श्रीगोंदा तालुक्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते व इम्पा संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉ. राजेश पाखरे यांना राज्यस्तरीय आदर्श समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. गरुड फाउंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव राहुरी येथील महत्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. या प्रसंगी खासदार निलेश लंके, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, रावसाहेब खेवरे, पोलीस आयुक्त संदीप भांड, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पत्रकार रमेश खेमनर व पत्रकार जावेद शेख यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

डॉ. पाखरे यांना वैद्यकीय सेवा तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदान याबद्दल हा सन्मान मिळाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सांगितले, “गरुड फाउंडेशन, पत्रकार संघ व सर्व संयोजकांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. या पुरस्कारामुळे माझ्यावर समाजाप्रती जबाबदारी अधिक वाढली आहे.”

त्यांच्या या यशाबद्दल तालुक्यातील विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25 ° C
25 °
25 °
85 %
3.8kmh
100 %
Sun
31 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
27 °
error: Content is protected !!