श्रीगोंदा पोलिसांची मोठी कामगिरी : जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी बेलवंडी पोलिस शोध घेत असलेले आरोपी श्रीगोंद्यात अटकेत

श्रीगोंदा, दि. १४ जून २०२५ :
जिवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण, मारहाण, लूट आणि धमकी यांसारख्या गंभीर गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी विशेष मोहिम राबवून अटक केली. सदर आरोपींनी प्रविण लाला भोसले (रा. बाभुळगाव, ता. कर्जत) यांच्यावर पिस्तुल, तलवार आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला करून त्याच्याकडील सोन्याचे दागिने आणि आयफोन लुटला होता.

घटनाक्रम :
दि. १९ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता फिर्यादी प्रविण भोसले हे बेलवंडी शिवारात विहीर पाहणीस गेले असताना मयूर ईश्वर भोसले आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना “तु पोलिसांना खबरदारी देतोस काय?” असे म्हणून डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर जबरदस्तीने व्हेन्यु कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले व पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी शिवार व भिलवाडा-जांभळी रोड परिसरातील डोंगरात नेले. तेथे त्याच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून, सोन्याचे दागिने व मोबाईल हिसकावून घेतले. तसेच तलवार व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून “तुला खड्ड्यात पुरतो” अशी धमकी दिली.

या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात २३ मे रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता (गु.र.क्र. 0179/2025) विविध गंभीर कलमांसह शस्त्र अधिनियमांतर्गत.

शोध मोहिम आणि अटक :
श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीवरून भोळेवस्ती परिसरात सापळा रचून आरोपी 1) मयूर ईश्वर भोसले (24), 2) अविल उर्फ विशाल ईश्वर भोसले (23) आणि 3) ईश्वर बाजीराव भोसले (58) यांना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली व्हेन्यु कार (विनानंबर) जप्त करण्यात आली आहे.

मोठ्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पथकाची कामगिरी :
या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी गणेश उगले, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश अहिरे, पोउनि संपत कन्हेरे, पोउनि सचिन लिमकर आणि गुन्हे शोध पथकातील संग्राम जाधव, संदीप शिरसाठ, संदीप राऊत, रविंद्र जाधव, अरुण पवार, गणेश साने, साळवे यांनी विशेष मेहनत घेतली.

सदर आरोपींना पुढील चौकशीसाठी बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25 ° C
25 °
25 °
85 %
3.8kmh
100 %
Sun
31 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
27 °
error: Content is protected !!