नागवडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मनस्वी साखरेचे घवघवीत यश – राज्यात दुसरी

श्रीगोंदा, दि. २९ जून २०२५ : मंथन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२४-२५ मध्ये तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यभरात आपले वर्चस्व सिद्ध करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या परीक्षेत इयत्ता पहिलीतील कु. मनस्वी मनोज साखरे हिने मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२५ मध्ये १५० पैकी १४८ गुण प्राप्त करून राज्यात दुसरा क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांनीही राज्य, जिल्हा आणि केंद्र स्तरावर यश संपादन करत शाळेच्या गुणवत्तेची पुनःप्रचिती दिली.

राज्य व जिल्हा स्तरावरील यशस्वी विद्यार्थी –

कु. मनस्वी साखरे (इयत्ता – पहिली) – राज्यात दुसरी

कु. विराट नागवडे (इयत्ता – पहिली) – राज्यात सहावा, जिल्ह्यात पहिला

कु. अवंती पवार (इयत्ता – दुसरी) – राज्यात सहावी, जिल्ह्यात पहिली

कु. प्रसन्ना गोलांडे (इयत्ता – दुसरी) – राज्यात आठवी, जिल्ह्यात तिसरी

कु. आराध्या कसले (इयत्ता – दुसरी) – राज्यात नववी, जिल्ह्यात चौथी

केंद्रस्तरावरील यशस्वी विद्यार्थी –

कु. समर्थ नागवडे (इयत्ता – पहिली) – केंद्रात पहिला

कु. राजवीर साळुंखे (इयत्ता – पहिली) – केंद्रात दुसरा

कु. शिवाज्ञा नागवडे (इयत्ता – तिसरी) – केंद्रात पहिली

कु. अंशुमन गिरमकर (इयत्ता – तिसरी) – केंद्रात दुसरा

कु. कनक धालवडे (इयत्ता – तिसरी) – केंद्रात चौथी

कु. तनिष्का खेतमाळीस (इयत्ता – चौथी) – केंद्रात दुसरी

कु. उत्कर्षा कुरुमकर (इयत्ता – चौथी) – केंद्रात तिसरी

कु. सुस्मित व्यवहारे (इयत्ता – चौथी) – केंद्रात चौथा

कु. श्रेयश पांडुळे (इयत्ता – आठवी) – केंद्रात पहिला

विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी, यासाठी विद्यालयामध्ये मंथन, ओलंपियाड, अबॅकस, NSE यासारख्या अभ्यासक्रमांचे नियोजन पूर्वप्राथमिक स्तरापासून केले जाते, अशी माहिती निरीक्षक एस.पी. गोलांडे सर यांनी दिली.

या यशस्वीत विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीतू दुलानी मॅडम, सर्व शिक्षकवृंद, तसेच तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधा ताई नागवडे, निरीक्षक एस.पी. गोलांडे सर आणि संपूर्ण शालेय कुटुंबाकडून अभिनंदन करण्यात आले.

या घवघवीत यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23 ° C
23 °
23 °
86 %
6.7kmh
100 %
Wed
23 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
27 °
error: Content is protected !!