श्रीगोंदा, दि. ११ जुलै २०२५ :
राज्यातील साखर उद्योगात भक्कम वाटचाल करणारे बाबुराव बोत्रेपाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ओंकार शुगर ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना मिठाई व शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर आणि प्रवचन यांचा समावेश होता.
हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्यावर आयोजित कार्यक्रमात वृक्षारोपण करण्यात आले तसेच कामगारांची आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रवचनकार श्रीकांत पावणे यांच्या सत्संगाने अभिष्टचिंतन सोहळ्याची सांगता झाली.
या कार्यक्रमाला ओंकार शुगरचे संचालक प्रशांत बोत्रेपाटील, रेखा बोत्रेपाटील, गौरी शुगरचे कार्यकारी संचालक रोहीदास यादव, सरपंच विद्या बनकर, उपसरपंच अमोल दरेकर, गंगाराम दरेकर, विकास क्षीरसागर, नवनाथ देवकर यांची उपस्थिती होती.
प्रशांत बोत्रेपाटील म्हणाले, “ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी ओंकार शुगर ग्रुपची स्थापना करण्यात आली. परिसराचा सर्वांगीण विकास हे आमचे ध्येय असून, भविष्यात स्थानिक शाळांना मदत केली जाईल.”
या निमित्ताने घुगल वडगाव येथील महामानव डॉ. बाबा आमटे सेवा संस्थेतील मुलांना तसेच हिरडगाव, घोडेगाव, चांडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना मिठाई व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.