श्रीगोंदा, दि. १३ जुलै २०२५ : श्रीगोंदे तालुक्यातील लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिर मंदिराचे कुलूप तोडून चोरी करणारा तसेच श्रीगोंदा शहरातील शनिमंदिर दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताकडून घरफोडी व चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
३० जून ते ३ जुलै दरम्यान लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात चोरीसाठी कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करण्यात आला होता. यामध्ये मंदिरातील दानपेटीतील रोकड चोरीस गेलेली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत श्रीगोंदा पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान संशयित आरोपी शुभम बबन भापकर (रा. गुंडेगाव, ता. नगर) याचे हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.असून या आरोपीवर श्रीगोंदा, नगर व राहाता, राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत
पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दानपेटी फोडण्यासाठी वापरलेले हत्यार, हातोडा, रॉड, स्क्रू ड्रायव्हर, आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.कॉ. मनोज साखरे, ज्ञानेश्वर भागवत, यांनी कामगिरी केली.