श्रीगोंदा, दि. ८ ऑगस्ट २०२५ :
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयश्री बिंटू भुजबळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच सुधाकर गोरे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
शुक्रवारी (दि. ८ ऑगस्ट २०२५) सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संध्या विजय शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली. ग्रामसेवक वैशाली शिंदे यांनी कामकाज पाहिले. उपसरपंचपदासाठी निर्धारित वेळेत फक्त जयश्री भुजबळ यांचा अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. विजय रसाळ यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य शाहूराज भोपळे, विलास रणशिंग, सोनाली भदे, मंगल शेंडे, पार्वती गवळी, रुपाली झेंडे, सुधाकर गोरे, गजानन जगताप आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच जयश्री भुजबळ यांचे गुलाल व फटाक्यांच्या आतिषबाजीत गावकऱ्यांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमास विजय शेंडे, भीमराव बेल्हेकर, वामन भदे, शिवाजी भदे, आबा मेहत्रे, धनराज भोपळे, बुवाजी रसाळ, रामदास रसाळ, किसन बेल्हेकर यांच्यासह ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते. निवडीनंतर ग्रामस्थ व मान्यवरांनी त्यांचे प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.