श्रीगोंदा, दि. २५ ऑगस्ट २०२५ :
काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे लोकसहभागातून संत सेना महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी स्थानिक विकास निधीतून तब्बल दहा लाखांचा निधी देऊन या मंदिर उभारणीस हातभार लावला. नुकतीच या मंदिरात संत सेना महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना माजी मंत्री बबनराव पाचपुते व ठाकरे सेनेचे मुंबईतील कार्यकर्ते इम्रानभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी भव्य कार्यक्रमात अध्यात्माचा जागर देखील करण्यात आला.
यावेळी बोलताना बबनराव पाचपुते म्हणाले, “काष्टीतील नाभिक समाजाची इच्छा होती की गावात संत सेना महाराजांचे मंदिर व्हावे. आज ती इच्छा पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे या मूर्तीसाठी ठाकरे सेनेचे कार्यकर्ते इम्रानभाई शेख यांनी दिलेले योगदान हे कौतुकास्पद आहे.”
कार्यक्रमास श्रीगोंदा तालुक्याचे लाडके आमदार विक्रम पाचपुते, ठाकरे सेनेचे कार्यकर्ते इम्रान शेख, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, काष्टीचे सरपंच साजन पाचपुते, बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार, महेश्वर पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय गावडे, साई सेवा पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव पाचपुते, काष्टी सोसायटीचे चेअरमन राकेश पाचपुते, खुलेश्वर पतसंस्थेचे चेअरमन सुनील दरेकर, स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन आबा कोलटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण अण्णा नलगे, काष्टी नाभिक संघटनेचे अध्यक्ष आप्पा रंधवे, चंदू पाचपुते, उपसरपंच सोमनाथ टिमुणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यास काष्टीतील नाभिक समाज, ग्रामस्थ व गावकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. संत सेना महाराजांचे मंदिर उभारल्याने गावकऱ्यांची जुनी इच्छा पूर्ण झाली असून या उपक्रमामुळे गावात अध्यात्मिक व सामाजिक ऐक्याची भावना दृढ झाली आहे.