श्रीगोंदा, दि. ४ सप्टेंबर २०२५ :
भारतीय जनता पार्टीच्या श्रीगोंदा तालुक्यातील पूर्व मंडल कार्यकारिणीची नवीन घोषणा दि. ३ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा येथे करण्यात आली. माजी मंत्री मा. बबनराव पाचपुते व मा. प्रताप पाचपुते यांच्या हस्ते सुभाष भदे, सागर भोपळे, महेंद्र रणसिंग यांची भाजपा कार्यकारणीत निवडपत्र देऊन निवड करण्यात आली.
घोषित कार्यकारिणीनुसार, सुभाष भदे यांची श्रीगोंदा तालुका ओबीसी सेल सरचिटणीसपदी, सागर भोपळे यांची श्रीगोंदा तालुका ओबीसी सेल उपाध्यक्षपदी तसेच महेंद्र रणसिंग यांची अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष संदीप नागवडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र उकांडे ,श्रीगोंदा पूर्व मंडल तालुकाध्यक्ष विक्रम भोसले, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ धेंडे, यांच्या विशेष उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी शेडगाव गावचे प्रतिष्ठीत नागरिक तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाकर भदे, ईश्वर भुजबळ,अजिनाथ अनारसे, लिंबाजी भदे , सागर शेंडे, तुषार भोपळे, प्रतीक धेंडे, अक्षय धेंडे, विशाल धेंडे, भाऊसाहेब माने, नितीन घायतड व प्रशांत धेंडे आदींनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकारिणीमुळे श्रीगोंदा तालुक्यात भाजप संघटनात्मक पातळीवर आणखी बळकट होणार असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.