टीम लोकक्रांती : आढळगाव प्रतिनिधी दि.२२ सप्टेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंतीचे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने भव्य मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले यावेळी शाळेपासून गावात मिरवणूक काढण्यात आली.
कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमेला हार , पुष्पगुच्छ, फुलांनी सजवून मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी झांज पथक ढोल पथक व लेझीम पथक लय बद्ध सादरीकरण केले. ही मिरवणूक पूर्ण गावामधून काढण्यात आली विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी घोषणा देत मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभाग नोंदवला.
- स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असे सांगणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण रुपी एका वट वृक्षाचे रोपटे लावले होते त्या वृक्षाचे आज अनेक वटवृक्ष पाहायला मिळत आहेत.
यावेळी आढळगाव चे ग्रामस्थांनी या मिरवणुकीचे मोठा आनंदाने स्वागत केले व प्रतिमेचे पूजन केले व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले ही मिरवणूक संस्थेचे प्राचार्य साळुंखे एस एस यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी संस्थेचा सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता.
स्त्रोत:(सचिन शिंदे)