टीम लोकक्रांती
श्रीगोंदा दि.13/08/2022 रोजी फिर्यादी खंडू सखाराम बाबर वय 18 वर्ष रा.भानगाव ता.श्रीगोंदा यांनी फिर्याद दिल्ली की राहत्या बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून घरामध्ये ठेवलेली रोख रक्कम व घरासमार लावलेली मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 619/2022 भा.द.वि.क 379,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे. सदर गुन्हयाचा तपास चालू असताना रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन याना खात्रीलायक बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार ) ज्ञानेश्वर काढण्या भोसले 2 ) अविनाश उर्फ पिंटया काढण्या भोसले दोघे रा. कोळगाव ता. श्रीगोंदा यांनी केला आहे. मिळालेल्या बातमीवरून पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोसई प्रदिप बो-हाडे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी यांनी कोळगाव ता. श्रीगोंदा येथे दि.17/08/2022 रोजी गुन्हेगारी वस्त्यावर कॉविंग ऑपरेशन केले असता वर नमुद संशियित इसम मिळून आले त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी मानगाव येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. वरील आरोपीकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
1) गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम 5500 /-रु.
2) गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटार सायकल क्रमांक एम. एच.12 ए. एम. 3691
3) गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल क्रमांक एम. एच. 16 झेड. 6234 असा 85500/- ( पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये ) किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरील दोन्ही आरोपी हे जबरी चोरी, दरोडा करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांनी खाडेवाडी ता. मावळ जि. पुणे या ठिकाणी दि. 8/12/2016 रोजी दरोडा टाकुन खुन केला होता. त्यांच्या विरुध्द लोणावळा ग्रामिण पोलीस स्टेशन जि. पुणे गु.रजि. नं. 118/2016 भा.द.वि.क. 395,396,397 मोक्का 3 ( 1 ) ( 1 ) ( 11 ) 3 ( 4 ) अन्वये दाखल आहे. सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपी सहा वर्षापासून फरार होते. दोन्ही आरोपींना श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 619/2022 भा.द.वि.क 379,457,380 मध्ये अटक करण्यात आली आहे. आरोपीताकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपिंवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1) ज्ञानेश्वर काढण्या भोसले वय 40 वर्षे रा. कोळगाव ता. श्रीगोंदा 1) लोणावळा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गु.रजि.नं 118/2016 भा.द.वि.क .395.306.307 मोक्का 31001 ) 3 (4) ( फरार ) 2) बेलवंडी पोलीस स्टेशन गु.रजि.नं .21/2019 भा.द.वि.क .395.397,420 फरार ) 3) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि.नं 356/2020 भा.द.वि.क. 379 4) संगमनेर तालुका पोलीस स्टेशन गु.रजि.नं.128/2021 भा.द.वि.क. 457,380.11.34 5) श्रीगोंदा पोलीस स्टेशन ग . र.जि.नं 619/2022 भा.द.वि.क. 379,457,380 6) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि.नं 62.3 / 2022 भा.द.वि.क. 379 7) नगर तालुका पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 202/2011 [भा.द.वि.क. 399,402 2) अविनाश उर्फ पिंट्या काढण्या भोसले वय 42 वर्ष रा. कोळगाव ता. श्रीगोंदा 1) लोणावळा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गु. रजि. नं 118/2016 भा.द.वि.क. 395,3886,397 मोक्का 3 (1) (1) (11) 3 (4) ( फरार ) 2) बेलवंडी पोलीस स्टेशन गु.रजि.नं 21/2019 भा.द.वि.क. 395,397.420 फरार ) 3) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि.नं 15/2016 भा. द.वि.क. 395,397,420 4) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि. नं 369/2009 भा.द.वि.क .457,380 5) श्रीगोंदा पोलीस स्टेशन ग.रजि.नं 619/2022 भा.द.वि.क. 379,457,380 6) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु. रजि. नं 623/2022 भा.द.वि.क. 379
वरील उत्कृष्ट कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.बी. जे.शेखर पाटील साहेब. पोलीस अधिक्षक मा. मनोज पाटील साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक मा. सौरभकुमार अग्रवाल साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी मा . अण्णासाहेब जाधव साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोसई प्रदिप बो-हाडे, सफो अंकुश ढवळे ( SDPO कार्या ) पोना गोकुळ इंगवले, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादासाहेब टाके, पोकॉ अमोल कोतकर, पोकॉ रविंद्र जाधव यांनी केली आहे.