टीम लोकक्रांती
- श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील वडार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद भीमा लष्करे वय 65 यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले .गोविंद लष्करे यांचे लिंपणगावच्या सामाजिक कार्यात मोठा सहभाग होता. वडार समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी भरीव असे योगदान दिले. एक सामान्य वडार कुटुंबातील व्यक्ती म्हणून त्यांची संपूर्ण तालुक्यात ओळख होती. वडार समाजाच्या प्रश्नासाठी तसेच त्यांना रोजी रोटी उपलब्ध व्हावी म्हणून वडार समाजातील लोकांना एकत्र करत अनेक कल्याणकारी योजना राबवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असे. त्यांनी लिंपणगाव सेवा संस्थेमध्ये संचालक म्हणूनही उत्तम प्रकारे काम पार पाडले. या संस्थेच्या जडणघडणीमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले. सामाजिक प्रश्नाची जाण असणारे हे व्यक्तिमत्व नुकतेच काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण वडार समाज व लिंपणगाव परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे.
कै गोविंद लष्करे यांनी सामाजिक व राजकीय जीवनात काम करताना प्रत्येक सार्वजनिक निवडणूक असो व धार्मिक कार्यक्रम असो त्यावेळी संपूर्ण वडार समाजाला एकत्रित करत गोविंद लष्करे यांनी हा वडार समाज एकसंघ ठेवण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असायचा. गाव पातळीवर त्यांचे सर्व समाजाशी सलोख्याचे संबंध होते. त्यामध्ये वडार समाजाचाही त्यांच्यावर मोठा दृढ विश्वास होता. आपल्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी दिवंगत सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या समर्थ नेतृत्वावर विश्वास ठेवत सहकार महर्षी बापूंना नेहमीच राजकीय दृष्ट्या वडार समाजाचे बळ देण्यात पुढाकार घेत असे. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. असे हे सर्व गुणसंपन्न वडार समाजाचे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने वडार समाजाचा एक सच्चा व निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याने एक वडार समाजामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पक्षात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर लिंपणगाव येथे नुकतेच शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी लिंपणगाव पंचक्रोशीसह तालुक्यातील मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.