स.म.शि.नागवडे सहकारी साखर कारखान्याचा २०२२-२३ या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२६ सप्टेंबर २०२२ : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ सोमवार तारीख २६ रोजी दुपारी एक वाजता अतिशय साध्या पद्धतीने व उत्साही वातावरणात संपन्न झाला.

यावेळी कारखान्याचे सभासद व माजी संचालक  ज्ञानदेव तथा आबासाहेब कोल्हटकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चंद्रकला ज्ञानदेव कोल्हटकर, बबनराव तुकाराम शिंदे व त्यांच्या सुवद्य पत्नी सौ. कुसुम बबनराव शिंदे , चंद्रकांत ताराचंद कटारिया व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैजयंता चंद्रकांत कटारिया , हृदय गौतम घोडके व त्यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका सौ. सोनाली हृदय घोडके आणि अहमद आझमभाई हवलदार व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ. तायरा अहमद हवलदार, अजय शहाजीराव नागवडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुषमा अजय नागवडे या उभयतांच्या शुभ हस्ते बॉयलरची विधिवत पूजा संपन्न झाली.

यावेळी कारखान्याचे चेअरमन  राजेंद्र दादा नागवडे म्हणाले की, कारखान्याने सन २०२२-२३ या गळीत हंगामाची तयारी पूर्ण केलेली असून गतवर्षीपेक्षा जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. नागवडे कारखान्याचा सन २०२१-२२ मधील साखर उत्पादन खर्च १४४३-२१ रुपये प्रति क्विंटल व तोडणी वहातुक खर्च ६५०-७५ इतका आलेला आहे. इतर कारखान्याचे तुलनेत आपला खर्च कमी आहे. नागवडे कारखाना ऊस दराबाबत कधीही मागे राहिलेला नाही. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्यास ऊस गळितास देऊन गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करावे. मागील वर्षीचे उर्वरित ऊस पेमेंट व गतवर्षीप्रमाणे प्रत्येक सभासदाला दहा किलो साखर दिवाळीपूर्वी देण्यात येणार असल्याचे सांगून नागवडे कारखाना भविष्यकाळातील गरज ओळखून इथेनॉल उत्पादनाबरोबरच बगॅसपासून सी. बी. जी. गॅस व ब्रिकेट बनविण्याचा बी.ओ.टी.. तत्त्वावर पथदर्शी प्रकल्प हाती घेणार आहे.

यावेळी व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कारखाना उत्तम चालविणे व गाळप हंगाम यशस्वी करणे करिता व्यवस्थापनाबरोबरच ऊस उत्पादक शेतकरी व कारखान्याचा अधिकारी व कामगार वर्ग यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. म्हणून येणाऱ्या गळीत हंगामात उच्चांकी गळीत करण्याकरिता ऊस उत्पादक सभासद शेतकरी व अधिकारी कामगार यांनी काम करण्याचे आवाहन केले.

स्वागत व प्रास्ताविक संचालक सुभाष काका शिंदे यांनी केले तर संचालक शरद जगताप यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास श्रीगोंद्यातीलच्या नगराध्यक्ष सौ. शुभांगी ताई पोटे संचालक सर्वश्री राकेश पाचपुते, अनिल मामा पाचपुते, श्रीनिवास घाडगे, प्रशांत दरेकर, प्रशांत शिपलकर, विश्वनाथ गिरमकर , भाऊसाहेब नेटके, दत्तात्रय काकडे , प्रा. सुरेश रसाळ, लक्ष्मण रायकर , भीमराव लबडे, विठ्ठल जंगले, बंडू जगताप, संदीप औटी, सावता हिरवे, भाऊसाहेब बरकडे तसेच सभासद कार्यकर्ते कारखान्याचे कार्यकारी संचालक रमाकांत नाईक सर्व खातेप्रमुख व कामगार उपस्थित होते.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्रक)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.7 ° C
21.7 °
21.7 °
97 %
6.3kmh
100 %
Sat
22 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!