टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२७ सप्टेंबर २०२२ : मंगळवार दि.२७ सप्टेंबर रोजी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना ऋतुजा शेंडगे आणि शीतल शेंडगे व नागरिकांनी निवेदन दिले.शेंडगेवाडी (काष्टी रोड) परिसरातील नागरिकाच्या घरामध्ये तुंबलेल्या पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे तातडीने नुकसानभरपाई मिळावी तसेच भविष्यात पाणी तुंबणार नाही याबाबत तातडीने योग्य ती कारवाई होण्यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे श्रीगोंदा दौऱ्यावर असताना श्रीगोंदा येथे त्यांना निवेदन दिले.सुदाम दादाराम शेंडगे यांनी इतर नागरिकांसह वारंवार मागणी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने सर्वांनी आमरण उपोषण करण्याचा यावेळी इशारा दिला.
श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील नुकत्याच झालेल्या एन. एच. ५४८ क्र. डी या महामार्गालागतच्या शेंडगेवाडी काष्टी रोड परिसरामध्ये महामार्गाच्या दोन्ही बाजूने गटार लाईन केलेली नसल्याने रस्त्यावर पावसाचे जमा झालेले पाणी थेट घरामध्ये घुसत असून यामुळे परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल होत असून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. असलेबाबत महसूल, नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनास निवेदन देवून तातडीने कारवाई करण्याबाबत आम्ही परिसरातील नागरिकांच्या सह्यांचे निवेदन यापूर्वी दोन वेळा देवूनही योग्य ती कारवाई झाली नाही.
सध्या वारंवार होणाऱ्या पावसामुळे घरामध्ये राहणे धोकादायक बनले असून सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी झालेल्या मोठ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी घरामध्ये शिरले आहे. तसेच जनावरांना लम्पीसारख्या रोगांनी ग्रासले असून यातून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. तरी या नागरिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे तातडीने नुकसानभरपाई मिळावी, आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात तसेच भविष्यात पाणी तुंबणार नाही याबाबत तातडीने योग्य ती कारवाई होण्याच्या मागणीसाठी आम्ही शेंडगेवाडी परिसरातील नागरिक दि. ०३/१०/२०२२ रोजी श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत.
स्त्रोत:(निवेदन)