टीम लोकक्रांती : आढळगाव प्रतिनिधि दि.२७ सप्टेंबर २०२२ : रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडात नावारूपाला आलेली सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. असे मत कर्जत जामखेड चे आमदार रोहित दादा पवार यांनी व्यक्त केले. पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ़ सायन्स आढळगाव व आढळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली.तसेच विद्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ व आढळगाव कोविड सेंटर यांनी दिलेल्या थोर देणगी मधुन तयार करण्यात आलेल्या प्रयोगशाळेचा उद्घाटन समारंभ आमदार रोहित पवार यांच्या हस्ते मंगळवार दि २७ रोजी दुपारी २:३०वाजता आढळगाव येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिक्रमा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. डॉ. प्रतिभाताई पाचपुते या होत्या.
पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटलांचे शिक्षण क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. गोर गरीब लोकांच्या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी ही शिक्षण संस्था चालू केली. आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले. यासाठी अण्णांनी खूप कष्ट घेतले. तसेच देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. व त्यांचे स्वप्न आहे की संस्थेच्या जास्तीत जास्त वर्ग शाळा तयार झाल्या पाहिजे. व त्यामध्ये बहुजनांचे मुलं शिकली पाहिजे. व देशाचे भविष्य घडले पाहिजे. व तसेच नॅशनल हायवे ५४८ हा रोड शाळेत लगत जात असून शाळेचे खेळाचे मैदान रोडच्या पलीकडे असले कारणाने तेथे मैदानावर ये जा करण्यासाठी ब्रिज साठी आपण संबंधित ठेकेदाराशी बोलून व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. आढळगाव विद्यालयासाठी विद्यालयापासून एक किलोमीटरच्या अंतरावर दोन एकर क्षेत्र उपलब्ध करून द्या मी विद्यार्थ्यांसाठी क्रिकेटचे स्टेडियम बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देईल असा शब्द दिला रोहित पवार बोलत असताना संस्थेचे अध्यक्ष सुभाष शेठ गांधी यांच्याकडे मागणी केली असता अध्यक्ष सुभाष गांधी यांनी दोन एकर शब्द द्यायचा ही मान्य केला त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले. नंतर त्यांनी प्रयोगशाळेची पाहणी करून शिक्षकांशी व शाळेतील विद्यार्थ्यांची संवाद साधला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, राजेंद्र मस्के, रयत जनरल बॉडी सदस्य सुभाष लाल गांधी, विभागीय अधिकारी कन्हेरकर साहेब ,मा. जिल्हा परिषद अनिल ठवाळ, यांनी आपले मनोगत व्यक्त
यावेळी उपविभागीय अधिकारी तापकीर साहेब, महाराजा जिवाजीराव शिंदे विद्यालय श्रीगोंदा, प्राचार्य म्हस्के साहेब उपप्राचार्य पाटील साहेब,सरपंच बंटी उबाळे, उपसरपंच सौ. अनुराधाताई ठवाळ, पत्रकार उत्तम राऊत, मा उपसरपंच अंबादास चव्हाण बीजेपी जिल्हाध्यक्ष जावेद भाई इनामदार, सुभान तांबोळी, ज्येष्ठ नेते शहाजी बापू वाकडे, कमिटी संचालक सत्यवान शिंदे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर बोडके, मनोज शिंदे ,अविनाश मिसाळ ,मधुकर गिरमकर, हनुमंत डोके, संतोष काळे, शरद जमदाडे, राष्ट्रवादी नेते राहुल राऊत, माजी उपसरपंच अंबादास चव्हाण, बाळासाहेब शिंदे ,गणेश शिंदे, भाऊसाहेब बोत्रे ,कमिटी संचालक देवरावजी शिंदे ,माजी सरपंच नाना बोळगे, डोके गुरुजी, कमिटी संचालक अशोक डॉक्टर वाकडे सदस्य नितीन गव्हाणे मा सभापती विलासराव भैलुमे यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते.ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी चेअरमन संचालक तसेच पत्रकार,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री साळुंखे एस एस यांनी केले. तसेच अध्यक्षीय भाषणात बोलताना सौ. प्रतिभाताई पाचपुते म्हणाल्या की, शिक्षणाची ज्ञानगंगा कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांनी बहुजनाच्या दारात आणली, व बहुजन समाजाचा उद्धार केला. व कर्मवीर अण्णांनी सातारा येथे लावलेले शिक्षणाचे रोपटे संपूर्ण महाराष्ट्रात वटवृक्ष म्हणून पसरले आहे.आज २२ हजार विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकत आहेत. व तसेच तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते साहेब हे कुकडीच्या पाणी संदर्भात मीटिंगसाठी मुंबईला गेले असल्याकारणाने, ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने मी या ठिकाणी उपस्थित आहे. शिक्षणासंदर्भात व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात काही अडचणी असतील, तर तालुक्याचे आमदार पाचपुते साहेब हे प्रश्न नक्की सोडवतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ.पाचपुते म्हणाल्या की डॉक्टर, इंजिनियर, वकील, आयपीएस, ही होण्याची जी तुमची इच्छा आहे, हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिले स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत, जिद्द, चिकाटीने ,अभ्यास करावा लागणार आहे तरच ते पूर्ण होईल असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक बापू काळे सर यांनी केले तर आभार शेळके व्ही के सर यांनी मानले. कार्यक्रमास ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्त्रोत:(सचिन शिंदे)