शाळकरी मुलांना पळून नेत असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण; श्रीगोंदा तालुक्यातील ‘या’ ठिकाणची घटना!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२८ सप्टेंबर २०२२ : शाळकरी मुलाला पळवून नेत असल्याच्या संशयावरून दोघाजणांना जवळपास दोनशे ते तीनशे लोकांच्या जमावाने मारहाण करत स्विफ्ट गाडी फोडल्याची घटना एक तासापूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी याठिकाणी घडली आहे

श्रीगोंदा पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन संशयितांना ताब्यात घेतले असून यातील एकजण पारनेर,तर एकजण श्रीगोंदा येथील असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे

  • सध्या राज्यात मूल पळवणारी टोळी समजून जमावाने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडत असतानाच आज श्रीगोंदा तालुक्यातील देखील तशीच घटना घडली आहे.

सदर दोघे संशयित व्यक्ती काष्टी कडून अजनूज कडे जात असताना त्यांनी रस्त्याने चाललेल्या शाळकरी मुलाला गाडीत बसवले त्यानंतर त्याचे घरजवळ आल्यानंतर त्यांनी त्या मुलाकडे पैसे मागत त्याला घाबरवायला सुरुवात केली सदर मुलाने याबाबत गावात त्याच्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर मोठा जमाव जमला त्यांनी या दोघा संशयितांना जबर मारहाण करत त्यांची स्विफ्ट गाडी देखील फोडली

पोलिसांना याबाबत माहीती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अभंग,स.फौ अंकुश ढवळे,पो कॉ किरण बोराडे,पो कॉ प्रताप देवकाते,पो ना भरत इंगवले,रवि जाधव हे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी प्रसंगावधान राखत जमावाला शांत करत सदर संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

स्त्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
30 ° C
30 °
30 °
53 %
2.5kmh
100 %
Fri
30 °
Sat
25 °
Sun
30 °
Mon
28 °
Tue
28 °
error: Content is protected !!