टीम लोकक्रांती
मुंबई:लहुजी आर्मी संघटनेच्यावतीने मातंग समाजाच्या मागण्यासाठी आजाद मैदान येथे मातंग समाज आक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी मातंग समाजावर होणारे अन्याय-अत्याचार तात्काळ थांबविण्याकरिता सरकारने अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करून जलदगतीने न्यायालयात कार्यवाही करावी, पानशेत पूरग्रस्त मागासवर्गीय सहकारी संस्थेतील मातंग समाजाच्या मूळ पूरग्रस्त व त्यांच्या वारसांच्या प्रलंबित मागण्याची तत्काळ दाखल घ्यावी, क्रांतीवीर लहजी साळवे मातंग अभ्यास आयोगाने करण्यात आलेल्या ६८ शिफारशीची महाराष्ट्र शासनाने खातेनिहाय आदेश काढण्यात यावा, केंद्र शासनाने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथील राष्ट्रीय स्मारकाच्या जमिनीवर टाकण्यात आलेले आरक्षण हे आर्ट आणि गॅलरी ऐवजी स्मारक असे करावे, मातंग समाजाच्या मालकीच्या एक किवा दोन गुंठे जमिनीचा ८४ क शेरा विना नजराणा घेता कमी करण्यात यावा, कोरोनाच्या महामारीमुळे बाधित झालेल्या आणि ज्यांचे सिबिल(cibil) चे आकडेवारी कमी झाली आहे त्या मातंग तरुण-तरुणी साठी उद्योग-धंद्याचे कला-कौशल्यचे प्रशिक्षण देवून विना सिबिल(cibil) ची आकडेवारी ग्राह्य धरून कर्ज उपलब्ध करून द्यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या धर्तीवर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करण्यात यावी, अनुसूचित जाती व जमाती करिता असलेल्या एकत्रित आरक्षणाचे अ ब क ड प्रमाणे लोकसंखेनुसार वर्गवारी करण्यात यावी. या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
या संदर्भात लहुजी आर्मी चे संस्थापक अध्यक्ष अंबादास सूर्यवंशी म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान न्याय व हक्क दिला आहे. त्याच बरोबर मुलभूत अधिकार हि दिले आहे. संविधानात अनुक्रमे भाग ३ आणि ४४ असा त्याचा क्रम आहे. संविधानाच्या उद्देशपात्रिकेत सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय तसेच दर्जाची व संधीची समानता करून देण्याची हमी देण्यात आली आहे. परंतु आज एकविसाव्या शतकातही मातंग समाज विकासापासून वंचित आहे. देशाला स्वातंत्र मिळून आजतागायत ७५ वर्ष झाली. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असल्याने अनेक मुलभूत समस्या आणि प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये अशिक्षितपणा, दारिद्र, बेरोजगारी, अन्याय अत्याचार, व्यसनधीनता आणि गुन्हेगारीचा समावेश आहे. मागण्या केंद्र व राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. लोकशाही मध्ये मागण्या मान्य करण्यासाठी सनदशीर मार्गाने आम्ही प्रयत्न करत आहे. मागण्या मान्य न झाल्यास मातंग समाज राज्यभर तीव स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
सदर आंदोलनाला प्रभाकर इंगळे, गोपीनाथ कांबळे, नरसिंह सूर्यवंशी, मुकेश जाधव, परशुराम भवाल, दिलीप खुडे, किशोर खुडे, मोहन खिल्लारे, विशाल ढावरे, सागर वायदंडे, कविता ननावरे, माया वायदंडे, कमल बागाव, वर्षा खुडे, अश्विनी अवघडे, मीरा आरडे, नंदा शिंदे, मंदा शिंदे, उज्जवला गिरे, तानाजी दाकले, प्रशांत अस्वरे, रमेश राजगुरू आदी उपस्थित होते.
स्रोत:(ऑनलाइन)