टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि . २९ सप्टेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी येथे गुरुवार दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता १५० ते २०० तरुण तरुणी यांनी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान व विश्व हिंदू परिषद बजरंग दल आयोजित श्री.सिध्देश्वर तरूण मित्र मंडळ मुढेंकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
मुंढेकरवाडीत सकाळी ६ वाजता सर्व जण यमाई देवीचे मंदिरात जमून त्या ठिकाणी ध्वजाच पुजन करून प्रेरणा मंत्र म्हणला जातो व त्या नंतर ही दौड यमाई देवीचे मंदिरा पासुन पूर्ण गावात प्रदक्षिणा घालून परत यमाई देवी मंदिरात जाते.
ही दौड चालू असताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करत ,भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, आशा घोषणा देत आणि हर हर महादेव अशी गर्जना करत मग दौड यमाई देवी मंदिरात गेल्यावर परत प्रेरणा मंत्र म्हणून देवीची आरती घेऊन दौडीची समाप्ती होते.
स्त्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)