टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.३० सप्टेंबर २०२२ : गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता श्रीगोंदा शहारातील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वाधारण सभा संस्थेच्या सभागृह कार्यालयात आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश भंडारी होते.
पतसंस्थेला २५ वर्षे पुर्ण होत असल्याबद्दल (रौप्य महोत्सवी वर्ष) संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांच्या हस्ते संस्थेच्या कर्मचारी, दैनिक कलेक्शन एजंट यांचा सन्मान करण्यात आला.
सभेच्या वेळी संस्थेचे सचिव सुभाष तरटे यांनी मान्यवरांचे स्वागत व अहवाल वाचन केले. दरवर्षी प्रमाणे सभेमध्ये संस्थेच्या फायद्याचे आणि सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याबद्दल व इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष सुरेश भंडारी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला व संस्था आणि सभासद यांच्या हिताचे रक्षण सर्व संचालक मंडळ आणि संस्थेच्या कर्मचारी वर्गाच्या सहायाने येथुन पुढेही अव्याहतपणे करणार असल्याचे सांगितले. तसेच संस्थेच्या संचालक आणि काही सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सभेचे सुत्रसंचालन मधुसूदन गोसावी यांनी केले तर संस्थेचे व्हाईस चेअरमन जगन्नाथ आव्हाड यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी पतसंस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते
स्त्रोत:- (मिळालेल्या माहितीनुसार)