टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.३० सप्टेंबर २०२२ :
बुधवार दि. २८ सप्टेंबर रोजी स्विफ्ट गाडी मधून पेडगाव ला जात असताना, काष्टी अजनूज चौक येथून दोन इसम व एका शाळकरी मुलाला गाडीत लिफ्ट दिली.त्या दोन जणांना खरातवाडी येथे सोडण्याच्या दरम्यान त्यांच्या कडून १०-१० रुपये गाडी भडे म्हणून घेतले दोघांप्रमाणे त्या शाळकरी मुलाला गाडी भाडे मागितले. त्याने पैसे नसल्याचे सांगितल्यावर नमूद दोघांनी गमतीने त्याला तुझ्या किडण्याच काढून घेतो. अशी टिंगल केली. मात्र, ती टिंगल त्यांच्या चांगलीच अंगलट आली. त्या शाळकरी मुलाने गाडीतून उतरल्यावर आरडाओरडा केला. रस्त्याशेजरील वस्तीवर पळत जाऊन सांगितलं मग फोनवर ही माहिती त्याच्या वडिलांना दिल्यानंतर मोठा जमाव जमला त्यांची गाडी अडवली अनं यातील दोघांना मारहाण करत चांगलाच चोप देण्यात आला. मात्र त्यांनी याच जमावा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, काष्टीतून पेडगाव दिशेने आनंदवाडी येथे जाण्यासाठी निघालेल्या स्विफ्ट गाडीला दोन इसमांनी व एका मुलाने अजनुज चौकात हात केला. त्यांना खरातवाडी कडे जायचे होते. दोघांसह मुलाला गाडीत घेतले. खरातवाडी परिसरातील दोन्ही इसम १०-१० रुपये भाडे देऊन गाडीतून उतरले.गाडीत असलेल्या शाळकरी मुलाकडे देण्यासाठी पैसे नव्हते.त्याने पैसे नाहीत असे सांगितले त्यावर त्या दोघांनी टिंगल टिंगल मध्ये त्याला पैसे नाहीत तर, तुझ्या किडन्याच काढून घेतो असे म्हणाले. गडबडलेल्या मुलाने घाबरून उतरल्यानंतर संबंधितासह आसपासच्या लोकांना सांगितले.मुलं अपहरण करणारी टोळी गावात शिरली की काय? या संशयातून जमावाने नमूद गाडी अडवली आणि त्यांना विचारपूस करत मारहाण केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली.घटनास्थळी पोलीस आले. त्यावेळेस त्या दोघांची सुटका झाली. नंतर पोलीस स्टेशनला त्या दोघांनी घटनेची माहिती दिली. त्यानूसार गुन्हे दाखल करण्यात आले.
हरिभाऊ वाळुंज राहणार पिंपळगाव तुर्क, तालुका पारनेर याने दिलेल्या फिर्यादीनुसार जमावा विरोधात भादवि कलम १४३, १४७, ३२३, ४४१, ४२७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासन करत आहे. मुले पळविणारी टोळी समजून या गोष्टीची चर्चा मात्र जिल्हात चांगली चर्चेत आली.
स्त्रोत:(फिर्याद)