टीम लोकक्रांती : आष्टी प्रतिनिधी दि.२ ऑक्टोबर २०२२ :
आष्टी शहर व परिसराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारे रूटी इमनगांव ब्रम्हगांव व बेलगांव हे तिन्ही प्रकल्प ओहरफ्लो झाल्याने आष्टी व मुर्शदपूरकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून,इमनगांव रूटी प्रकल्पात तीन वर्षांपूर्वी गाळ उपसा मोठ्या प्रमाणावर केल्याने या प्रकल्पाची पाणी साठविण्याची क्षमता वाढल्यामुळे आष्टी शहरासह आसपासच्या गावांचा पाणीप्रश्न मिटला असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.
आष्टी तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प मानला जाणारा रूटी इमनगांव प्रकल्प ओहरफ्लो झाला आहे. आ.सुरेश धस यांनी परिसरातील शेतकरी व नागरिक समवेत पाहणी करून शनिवार दि.१ रोजी सांयकाळी ५ वा.जलपूजन केले.यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती बद्रीनाथ जगताप,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आजबे,नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्ञबुद्दे,शाखा अभियंता अभिमन्यु काळे,मूर्शदपूर सरपंच सचिन लोखंडे,नगर पंचायतचे गटनेते किशोर झरेकर,नगरसेवक अक्षय धोंडे,नगरसेवक शेख शरीफ, आष्टी तालुका दुध उत्पादक संघाचे व्हा.चेअरमन आत्माराम फुंदे,अजित घुले,सुरेश वारंगुळे,सुनील मेहेर,राजू शिंदे,बाळासाहेब बोराडे,गंगाधर गोल्हार,काळे,गंगाधर पडोळे,दादासाहेब गर्जे,खंडू तोडकर,मोहन झांबरे,अक्षय धोंडे,अशोक पवार,अतुल कोठुळे,भारत मुरकुटे,रिझवान शेख,सलीम कुरेशी,अविनाश निंबाळकर, बाळासाहेब घोडके,विनोद रोडे,नाना डांगरे यांच्यासह परिसरातील शेतकरी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,गेल्या तीन वर्षापूर्वी रूटी इमनगांव प्रकल्पाचा गाळ उपसा मोठ्या प्रमाणावर केल्याने परिसरातील शेतक-यांच्या जमिनी सुपीक होऊन या तलावाची पाणी क्षमताही वाढली आहे.यावर्षी आष्टी शहर व मुर्शदपूरला पाणी पुरवठा करणारे ब्रम्हगांव, बेलगांव व रूटी प्रकल्पभरल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असल्याचेही आ.धस यांनी सांगीतले.यावेळी आष्टी शहर इमनगाव, खानापूर, चिखली,रुटी,मंगरूळ, केळसांगवी, टाकळशिंग, दैठणा,पिंप्रीआष्टशिराळ, हनुमंतगाव या गावाचे शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
स्त्रोत:(प्रवीण पोकळे)