टीम लोकक्रांती : आष्टी प्रतिनिधी दि.४ ऑक्टोबर २०२२ :
आष्टी तालुक्यातील सतत दुष्काळाला सामोरे जावे लागत असलेल्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाची सोय व्हावी या हेतूने खुंटेफळ साठवण तलावाच्या कामासाठी मी प्रयत्न केलेले आहेत या तलावात संबंधी ९७ टक्के प्रयत्न मी केलेले असून देखील मध्यंतरी अनेक प्रकारे हा तलाव होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पा बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अत्यंत तातडीने पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन खुंटेफळ साठवण तलाव सिंचन योजनेला २ हजार ८०१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने आष्टी तालुका दुष्काळ मुक्त होण्यास मदत होणार असून आपण केलेल्या पाठपुरावा हाती घेऊन या योजनेस मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अकरा दिवसापूर्वी दिलेल्या शब्द पाळला आहे असे प्रतिक्रिया आ.सुरेश धस यांनी दिली.
- आष्टीत शेतकऱ्यांचा आनंदोत्सव
- महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचे कळताच दुपारी आष्टी शहर किनारा चौक व कडा तालुक्यासह धानोरा तसेच खुंटेफळ,पुंडी,सोलापूरवाडी, बाळेवाडी या लाभक्षेत्रातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून तोफा वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ.सुरेश धस आणि भाजपा,शिवसेना युती सरकार यांच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी आभार मानले.
आ.धस पुढे म्हणाले, आष्टी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती नजरेसमोर ठेवून गेली १८ वर्ष आपण या प्रकल्पासाठी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. मध्यंतरी हा प्रकल्प बंद पडावा यासाठी अनेक विरोधकांनी प्रयत्न केले.परंतु महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वाचे निर्णय झाले होते.
- पाटोदा आणि शिरूर कासार साठी संयुक्त पाणी पुरवठा योजना
- पाटोदा आणि शिरूर कासार शहरासाठी जायकवाडी प्रकल्पातील स्रोताद्वारे संयुक्त पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठीप्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी या तालुक्यांसाठी टँकर भरण्यासाठी अमरापूर येथे ज्याप्रमाणे एक वॉटर पॉइंट अस्तित्वात आहे.त्या धर्तीवर जायकवाडी प्रकल्पातुन पाईपलाईन द्वारे शिरूर येथे टँकर भरण्यासाठी पॉईंट मंजूर करण्याचा देखील प्रयत्न सुरू असून ही योजना देखील लवकरच मंजूर होईल असे आ.सुरेश धस सांगितले.
तसेच दि.२३ सप्टेंबर रोजी आष्टी ते अहमदनगर रेल्वे शुभारंभ प्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यासपीठावरून लवकरच खुंटेफळ साठवण तलाव कामाबाबत चालू करण्यात येईल त्यासाठी आवश्यक त्या सर्वबाबी पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले होते. त्यानंतर केवळ ११ दिवसांमध्ये या योजनेच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. मराठवाडा सिंचन प्रकल्पाला ११७२६ कोटी रुपये आणि त्यातील खुंटेफळ साठवण तलाव उपसा सिंचन योजनेला २ हजार ८०१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.मराठवाड्याच्या हक्काच्या संपूर्ण पाण्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार असून तालुक्यातील आठ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.
स्त्रोत:(प्रवीण पोकळे)