टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.६ ऑक्टोबर २०२२ : महाराष्ट्र बारव मोहिम : एक अभिनव उपक्रम
नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीची उपासना करण्याचे नऊ दिवस.शक्ती आणि भक्तीचा संगम असणारे हे नऊ दिवस. देवीला आंघोळ घालताना पवित्र जल वापरले जाते. हेच पवित्र जल म्हणजे जीवंत पाण्याचा स्रोत असलेल्या पुरातन बारवा आहेत. पृथ्वीवरील पंच महाभुत एक पाणी आहे.”महाराष्ट्र बारव मोहिम” शिवदुर्ग परिवार जोमाने राबवत आहे.
नवरात्र म्हणजे आपल्या पूर्वजांची ऐतिहासिक परंपरा जपण्याचा उत्सव. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या ९ महिला रणरागिणी यांनी ९दिवस देवींच्या पुजेबरोबर बारव स्वच्छता करून, रांगोळी काढून फुलांचे तोरण बांधून, विधिवत जलपूजन केले.आपल्या पूर्वजांनी मोठ्या कष्टाने बांधलेल्या बारव जतन करण्यासाठी गावोगावच्या जनतेने पुढें यावें असा संदेश दिला.
संपुर्ण महाराष्ट्रात “महाराष्ट्र बारव संवर्धन मोहिम जोमाने सुरू आहे. या घडीला बारव पाण्याने तुडुंब भरलेल्या आहेत. बारवांतील जिवंत स्रोत असलेल्या पवित्र पाण्याचे जलपूजन करण्यात आले.
जलपूजन आपल्या पूर्वजांनी केलंय म्हणून आम्ही ही परंपरा जपतोय. रोहन काळे यांच्या विचारांना साथ देण्यासाठी, महाराष्ट्र बारवव मोहिम जोमाने पुढे नेण्यासाठी आम्ही महिलांनी हे पाऊल टाकले आहे.आम्हाला सर्वांची साथ हवी आहे. अशी भावना या सर्व शिवदुर्ग महिला रणरागिणीनी व्यक्त केली.
९ दिवस, ९ शिवदुर्ग रणरागिणी,९ बारव जलपूजन करण्यात आले. शेवटी दहाव्या माळीला ऐतिहासिक वारसा गडकिल्ले आणि वेस या स्थळांना दसरा सणाला तोरण बांधण्यात आले.
पहिली माळ -चींभळे – सीमा पाचपुते, दुसरी माळ देऊळगाव-काविता खराडे, तिसरी माळ रोटी ता. दौंड- तारा चांदगुडे.चौथी माळ- काशीबारव- विजया लंके, संगीता इंगळे. पाचवी माळ- बेलवंडी कोठार-उमा काटे. सहावी माळ- साळवण देवी – रोहिणी शेळके. सातवी माळ, काशी विश्वनाथ ढोरजे- सुप्रिया कुदांडे, हर्षदा गायकवाड.आठवी माळ, बोरुडेवाडी, सुचित्रा दळवी, त्रिवेणी कडूस. नववी माळ,बनखंडेश्वर मंदिर श्रीगोंदा- मंगल खराडे, मोक्षदा लोखंडे. यांनी बारवांचे जलपूजन केले.
भारतीय नागरिक म्हणून आपला ऐतिहासिक वारसा आपण जतन करूया.आपली संस्कृति आणि परंपरा यांचा अभिमान बाळगण्यासाठी आणि “महाराष्ट्र बारव मोहिमेस” दुर्गा मातेचा आशिर्वाद प्राप्त होण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला अशी माहिती शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी दिली.
शिवदुर्ग परिवाराच्या रणरागिणी, मावळयांच्या सोबत गावोगावचे नागरीक, तरुण-तरुणी, शालेय विद्यार्थी,अनेक मान्यवर गावोगावी उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर, प्रा. एन टी. पवार सर यांनीही “महाराष्ट्र बारव मोहिम” उपक्रमास व संवर्धन कार्यासाठी उपस्थीत राहून शुभेच्छा दिल्या.
स्त्रोत:(शिवदुर्ग ट्रेकर्स)