टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.७ ऑक्टोबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठणचे सरपंच जयश्री गुंजाळ विश्वास गुंजाळ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी यांनी शालेय कामकाजात कुचराई व पालकांना अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी देवदैठण प्राथमिक शाळेचे उपमुख्याध्यापक दौलत विठ्ठल उगले व शिक्षिका वंदना किसन भनगडे यांची बदली करावी या मागणीसाठी गुरुवारी श्रीगोंदा पंचायत समिती समोर उपोषण केले आणि या आंदोलनाची दखल घेत या शिक्षक दापत्यांची तडकाफडकी बदली केली.
गेल्या काही दिवसांपासून दौलत उगले व वंदना भनगडे या शिक्षक दापत्यांच्या विरोधात पालकांनी तक्रारी केल्या कि हे शिक्षक वेळेवर येत नाहीत शिकवत नाहीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी त्यांना समज दिली पण सुधारणा झाली नाही उलट दौलत उगले यांनी आण्णा हजारे यांच्या गावातील माझे कोणी काही करू शकत नाही असे बोल सुनावले.
गुरुवारी देवदैठण ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी श्रीगोंदा पंचायत समिती समोर उपोषण केले या आंदोलनास अतुल लोखंडे व सतिश धावडे बाळासाहेब महाडीक यांनी पाठिंबा दिला.
गटविकास अधिकारी राम जगताप गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि शिक्षक दापत्यांची पुढील चौकशी होईपर्यंत बदली करण्याचे आश्वासन दिले दौलत उगले यांची बदली अरणगाव दुमाला तर वंदना भनगडे यांची बदली पठारेवस्ती म्हसे येथे केली या बाबत गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी लेखी आदेश काढले आहेत.
स्त्रोत:(आप्पा चव्हाण)