टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.७ ऑक्टोबर २०२२ : लिंपणगाव, होलेवाडी तसेच शेंडगेवाडी श्रीगोंदा या ठिकाणी नॅशनल हायवे एन.एच.५४८ डी या महामार्गाच्या लगत शेतामध्ये व घरामध्ये जे पावसाचे पाणी जाते, त्याची अजून पर्यंत उपाययोजना झालेली नाहीत म्हणून समस्त लिंपणगाव, होलेवाडी व शेंडगेवाडी श्रीगोंदा समस्त शेतकरी बांधव.यांचे आमरण उपोषण सुरू आहे.
मार्च २०२२ महिन्यापासून वेळोवेळी अर्ज व निवेदन देऊन तसेच प्रत्यक्षात सांगून देखील पावसाचे पाणी जाण्याचे नियोजन करायचे असते ते अद्याप करण्यात आलेले नसून सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात मोठे नुकसान झालेले आहे.
त्याकरीता संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रत्यक्ष सांगून व पाहणी करुन देखील उपाययोजना करण्यास उडवाउडवीची उत्तरे देतात व शेतकरी बांधवास वेठीस धरुन वेगवेगळे कारणे सांगून टाळाटाळ करतात.
तसेच शेतकऱ्यांच्या शेतात ज्या पिकांचे नुकसान झालेले आहे, त्याची नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी व जो नॅशनल हायवे तसेच भारत गॅस रिसोर्सेस लि.या कंपनीने गॅसची पाईपलाईन केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी पावसाच्या पाण्याची अडवणूक करुन ठेवलेली आहे. त्यामुळे देखील शेतीमालाचे अतोनात नुकसान झालेले आहे.
तसेच त्या साचलेल्या पावसाचे पाण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार लहान मुले व शेतकरी बांधवास होत आहेत. त्या संबंधित ठेकेदाराला सांगून व संबंधित नॅशनल हायवेचे अधिकारी व गॅस पाईपलाईनचे अधिकारी यांनी रस्त्यालगत नाल्याचे नियोजन करुन ज्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी रस्ते किंवा वस्त्या आहेत त्या ठिकाणी सिमेंटी पाईप टाकून द्यावेत व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा
या सर्व मागण्यांसाठी झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी दि.०६/१०/२०२२ गुरुवार रोजी तहसिलदार यांचे दालनासमोर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करत आहोत, प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी.
स्त्रोत:(नुकसानग्रस्त शेतकरी निवेदन)