टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.९ ऑक्टोबर २०२२ : भारतीय मानव विकास सेवा संघा चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदिप बाळासाहेब शिंदे हे १४ आक्टोंबर रोजी बेलवंडी चे सहाय्यक अभियंता बावस्कर साहेब, यांच्या विरोधात मा. अधीक्षक अभियंता साहेब अहमदनगर यांच्या कार्यालया समोर बावस्कर यांचे कायमस्वरूपी निलंबन होईपर्यंत आमरण उपोषण करणार आहेत. अशा आशयाचे त्यांनी निवेदनही दिले आहे त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की व सविस्तर वृत्त असे आहे की गेल्या १ वर्षापासून अनेक वेळा सहाय्यक अभियंता श्री.बावस्कर साहेब यांच्याविषयी अनेक तक्रारी केल्या मात्र आपण आमच्या तक्रारीची दखल घेतल्याचे आमच्या निदर्शनास आले नाही.बावस्कर हे लोकांना विज जोडणी,नविन पोल देणे,मिटर देणे,यांसाठी जास्तीचे पैसे मागणे शेतकर्यांना आरेरावी करणे इत्यादी त्रास का देत आहेत, याचाही जाब आपण अद्यापही त्यांना विचारलेला आमच्या निदर्शनास आलेला नाही. त्यामुळे आंम्ही दिनांक १४ आक्टोंबर २०२२ रोजी बेलवंडी सहाय्यक अभियंता बावस्कर साहेब,यांना कायमस्वरूपी निलंबन होईपर्यंत आमरण उपोषण करणार आहोत.हे उपोषण यांचे निलंबन होईपर्यंत चालूच राहील.
यांनी आजपर्यंत बेलवंडी परिसरातील लोकांना खूप त्रास दिला आहे. या संदर्भात मी आपल्याला अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. या साहेबांना लोकांचे कामा विना मोबदला करणे कदाचित पसंद नसावे. या संदर्भात मी या अगोदरच पाठ पुरावा म्हणून अनुभवाचा अर्ज सादर केला आहे. तरी सुद्धा आपण कोणतीही कारवाई केली नाही. साहेबांचे पाहून त्यांचे कर्मचारी आणि वायरमन सुद्धा लोकांना त्रासच देत आहेत. हे खरे कि खोटे याची चौकशी आपण करावी.
- शिंदे यांच कोणतेही व्यक्तिगत काम माझ्यापर्यंत लेखी,तोंडी स्वरूपात आले नाही. शेतकऱ्यांचे वेळेवर काम करण्याचा प्रयत्न केला आहे : बावस्कर साहेब साह्यक अभियंता बेलवंडी
आपण शेतकरी यांस न्याय द्यावा अशा अशायचे निवेदन भारतीय मानव विकास सेवा संघा चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदिप बाळासाहेब शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते अजित पवार,अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक साहेब,मुंबई,मुख्य कार्यकारी अभियंता साहेब, नाशिक जिल्हाधिकारी साहेब,अहमदनगर, पोलीस अधिक्षक साहेब, अहमदनगर,कार्यकारी अभियंता साहेब,कर्जत यांना ई-मेल द्वारे निवेदन दिले आहे. याविषयी वरिष्ठांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही
स्त्रोत:(आप्पा चव्हाण)