टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१० ऑक्टोबर २०२२ : १० ऑक्टोबर २०२२ पासून आझाद मैदान मुंबई येथे अघोषित महाक्रोश आंदोलनात सहभागी होण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून हजारो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हक्काच्या पगारासाठी निघाले आहेत. गेल्या वीस ते बावीस वर्षापासून महाराष्ट्र सरकारमध्ये एकमेव असे क्षेत्र आहे की ज्या खात्यामध्ये विना वेतन म्हणजे बिन पगारी काम करावे लागत आहे.
पुरोगामी आणि भारत देशातील प्रगत अशा महाराष्ट्र राज्याच्य तसेच पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब आहे. शासनाने या विनावेतन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळीच पगार देऊन त्यांची वेठबिगारी थांबवावी.
आझाद मैदानात चालू असलेले आंदोलन हे ऐतिहासिक असे होणार आहे. महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांच्या वतीने चालू असणारे हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी अघोषित शिक्षक संघाने कंबर कसली आहे व ते ते मिळून घेणारच.
हे आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ओबीसी शिक्षक नेते प्राध्यापक पांडुरंग भोपळे,प्रा. दादासाहेब गिरमकर, प्रा. राम सोनवणे, प्रा. रेश्मा घोडके, प्रा, आशा सुद्रिक, प्रा. योगेश गायकवाड, प्रा, अतुल सुर्यवंशी, प्रा, सचिन आगळे व प्रा. नितिन झणझणे निघाले आहेत.
स्त्रोत:(प्रा.पांडुरंग भोपळे)