टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१० ऑक्टोबर २०२२ : श्रीगोंदा येथील सहयोग फाउंडेशनने थोर विचारवंत डॉ रफीक सय्यद यांचे हस्ते श्रीगोंदा तालुक्यातील आदर्श भुमिपुत्रांचा गौरव करुन मुहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अरुण रोडे होते.
यावेळी आमदार बबनराव बाबासाहेब भोस घनश्याम शेलार नगराध्यक्षा शुभांगी पोटे उपनगराध्यक्षा ज्योती खेडकर अरिफभाई शेख डॉ इब्राहीम सय्यद राजू गोरे भाऊसाहेब खेतमाळीस बापू गोरे अशोक खेंडके संग्राम घोडके लियाकत तांबोळी गुलाब तांबोळी उपस्थित होते प्रास्ताविक अजीम जकाते यांनी तर सुत्रसंचलन दादासाहेब देशमुख यांनी केले.
डाॅ रफीक सय्यद म्हणाले सर्व जाती धर्मातील साधू संताची मानवतावाद हीच शिकवण आहे त्यांचे चुकीचे अर्थ काढून वैचारिक भेसळपणा वाढविला जात आहे. सहयोग फाउंडेशनच्या सदस्यांनी आदर्श भुमीपुत्रांचा सन्मान महम्मद पैगंबर यांची जयंती साजरी चांगला उपक्रम हाती घेतला याचे अनुकरण इतरांनी करावे.
सत्कारमूर्ती
मुरलीधर होनराव, अरुणराव आनंदकर, हरिष खेडेकर, यासीन तांबोळी, हेमंत धुमाळ, प्रा संजय आनंदकर, डॉ नितीन खामकर, अख्तारभाई शेख, अनंत झेंडे, सतिश बोरा, अरविंद कापसे, हनुमंत फंड, संपत कोंथिबीरे, भावना दरेकर, सुवर्णा पाचपुते, दत्तात्रय जगताप, सुनील गव्हाणे व अग्नीपंख फौंडेशन.
स्त्रोत:(आप्पा चव्हाण)