टीम लोकक्रांती : आष्टी दि.१३ ऑक्टोबर : गेल्या पंधरा दिवसापासून परतीच्या पावसाने शेतके-यांचे कंबरडे मोडले आहे.सध्या पावसाने जे नुकसान झाले त्या नुकसानीचे बांधावर जाऊन कृषी व महसूल विभागाने पंचनामे करावे आशा सुचना आ.सुरेश धस यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.
परतीच्या पावसाने तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने बरेच पिके वाया गेले आहेत.त्यामुळे ज्या शेतक-यांचे नुकसान झाले त्या शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे कृषी अधिकारी तसेच महसूल अधिकारी यांनी पंचनामे करावे आशा सुचना आ.सुरेश धस यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.सध्या आष्टी तालुक्यातील सोयाबीन,तुर,कापूस,कांदा ह्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या परतीच्या पावसाने शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.परिणामी पिकांचे शेतात नुकसान झाले आहे.
स्त्रोत:(प्रवीण पोकळे)