टीम लोकक्रांती : आष्टी प्रतिनिधीदि.१३ ऑक्टोबर २०२२: गुरुवारी आष्टी शहर तसेच परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले.काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी देखील झाली मात्र मध्यंतरी आ.सुरेश धस यांनी केलेल्या तालुक्यातील आष्टी शहर,पांढरीसह नदी खोलीकरणाच्या कामामुळे कुठेही पूरजन्य परिस्थिती दिसली नाही त्यामुळे नागरिकांनी आ.धस यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
अधिकची मागणी न करता सरसकट तात्काळ पंचनामे करा..आ. सुरेश धस यांनी केली पाहणी..
आष्टी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून काही भागा मध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, गुरुवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे ब्रह्मगाव, हाजीपुर,पांढरी, सोलेवाडी,जामगाव, आष्टा ह.ना. ,आंधळेवाडी, पांगुळगव्हाण,करंजी,चिंचाळा, बेलगांव,बीडसांगवी,कर्हेवडगाव,कर्हेवाडी या गावांच्या महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून जाताना दिसत आहेत. शेतकऱ्यांना पीकविमा अँपवर अपलोड करा म्हणतेय पीकविमा कंपनी मात्र यामधील शेतकऱ्यांना काहीच कळत नाही.जेवढ्या शेतकऱ्यांने पीकविमा भरला असेल त्यांचा स्वतः कंपनीने अँपवर अपलोड करावा तसेच महसूल प्रशासनाने अधिकची मागणी न करता सरसकट पिंकाचे पंचनामे करावेत.अशी मागणी आ.सुरेश धस यांनी प्रशासनाला केली आहे.
आष्टी तसेच परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे.त्यामुळे शेती पिकाबरोबरच शेताचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.गुरुवारी मात्र पावसाने उग्र रूप धारण करून शहरासह परिसराला चांगलेच झोडपले.परंतु गेल्या दोन वर्षापूर्वी आ.धस यांनी केलेल्या नदी खोलीकरणाच्या कामामुळे पुराचा धोका तर टळलाच शिवाय यामुळे नागरिकांचे होणारे नुकसान टळले आहे.
शिवाय आष्टी शहरात गेल्या तीन वर्षापूर्वी नगरपंचायतच्या माध्यमातून झालेल्या तलवार नदीचे सुशोभीकरण व खोलीकरण,लेंडीनाला काँक्रीटीकरण व मजबुतीकरण,मोठं-मोठे सिमेंट रस्ते,नाली रुंदीकरण, भूमीगत गटारी या कामाचा देखील मोठा फायदा बाजार पेठेला झाल्याचे पहावयास मिळाले.नाहीतर सर्व व्यापार पेठेत पाणी शिरून दुकानदाराचे नुकसान झाले असते. गुरुवारी दिवसभर पाऊस सुरू असूनही शहरातील रस्त्यांचा कसलाही अडथळा जाणवला नाही.
स्त्रोत:(प्रवीण पोकळे)