टीम लोकक्रांती : आष्टी प्रतिनिधी दि.१४ ऑक्टोबर २०२२ : आष्टी तालुक्यातील मेहेकरी ते पिंपळगाव दाणी या दरम्यान नदीवरील पुलाचे काम सुरू असून त्यासाठीचा पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे रहदारीला अडथळे निर्माण झाले असताना आमदार सुरेश धस यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित गुत्तेदाराला सूचना करताच संबंधित यंत्रणेने केवळ आठ तासात मेहेकरी ते पिंपळगाव दाणी या दरम्यान नदीवरील पुलाचा पर्यायी रस्ता तयार केल्याने ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या पुलाचे काम सुरू होऊन अनेक दिवस झाले परंतु नदीवरील पूल बांधकामासाठी पाणी कमी करण्याचे भरपूर प्रयत्न झाले परंतु पाणी कमी होत नसल्यामुळे पुलाचे काम पुरेशा वेगाने होत नाही या पुलाच्या बांधकामामुळे पर्यायी रस्ता म्हणून डायवर्षण केले होते ते मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे वाहून गेल्यामुळे परिसरातील शेतकरी वाहन चालक विद्यार्थी यांचे अतोनात हाल झाले.
याबाबत आमदार सुरेश धस यांना माहिती मिळताच त्यांनी या घटनास्थळी भेट देऊन संबंधित गुत्तेदारांना तात्काळ पर्यायी रस्ता करण्याबाबत बजावले असता आज दिनांक १४ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत शाखा अभियंता डी.एम.बादाडे यांच्या उपस्थितीत ५० मीटर रुंद आणि ५०० मीटर लांब असा पर्यायी रस्ता (डायव्हर्शन ) करण्यात आला यामध्ये दोन नळ्यांचा एक जोड अशा दहा नळ्या वापरून हा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला यावेळी एक पोकलेन आणि ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला संबंधित गुत्तेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पिंपळगाव दाणी येथील ग्रामस्थांनी भरपूर मदत केली.
त्यामुळे केवळ आठ तासात पर्यायी रस्ता तयार झाल्यामुळे परिसरातील नागरिक शेतकरी वाहन चालक आणि विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त करून आमदार सुरेश धस यांचे आभार मानले आहेत
स्त्रोत:(प्रवीण पोकळे)