गोठा काँक्रिटीकरणाची बिले अदा न झाल्याने कोळगाव ग्रामस्थांचा १७ ऑक्टोबर रोजी आमरण उपोषणाचा इशारा; दीड वर्षापासून ची प्रकरणे प्रलंबित..!!

टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी दि १६ ऑक्टोबर २०२२ : दीड वर्षांपूर्वी केलेल्या गोठा कॉंक्रिटीकरण प्रकरणांची अद्याप पर्यंत बिले अदान न झाल्याने कोळगाव येथील नितीन भास्कर लगड, एकनाथ दत्तात्रय नलगे, बापूराव पांडुरंग लगड यांनी आमरण उपोषण दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी पंचायत समिती समोर करणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे दिली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, कोळगाव येथील श्री. एकनाथ दत्तात्रय नलगे व बापू पांडुरंग लगड़ या शेतकऱ्यांनी २२/०६/२०२१ रोजी साधारण दिड वर्षापूर्वी गोठा कांक्रीटीकरण योजनेसाठी प्रकरणे सादर केली. त्यानतर अनेक वेळा पंचायत समितीचे उंबरे झीजवल्यानांतर देखील फक्त आज पावेतो एकनाथ नलगे यांचे प्रकरण ऑनलाइन झाले. त्यात देखील प्र. मा ही ७७०००/ रू ची असताना देखिल प्रकरण ऑनलाइन ला मात्र फक्त ५६०००/ रु मंजूर झाली. याबाबत त्यांनी चौकशी केली असता ती रक्कम काटछाट होऊन तेवढेच येतात असे संगीतले . विशेष म्हणजे पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड याना देखील हेच उत्तर देण्यात आले. यावर कळस म्हणजे एका अधिकारी यांच्या कडून असे सांगण्यात आले की, तुमच्या गावचा ६०:४० रेश्यो कमी आल्याने हे पैसे कमी येतात. वास्तविक सदर पैसे हे अर्ध कुशल चा मस्टर सादर न केल्याने कमी आले आहेत. सदर प्रकारणात अर्धकुशल चे मस्टर गटविकास अधिकारी सादर करातात. सदर व्यक्तींनी जिल्हा परिषदला तक्रार केल्यानंतर तेथील अधिकारी वर्गाने सूचना दिल्यानंतर पंचायत समिती अधिकारी वर्गाने असे सांगितले की, अकुशलची बिले काढण्याची प्रक्रिया चालू केल्याचे समजले.

नितीन लगड़ यांचे प्रकरण देखील दिड वर्षापूर्वी सादर केले आहे. ते अद्याप ऑनलाइन झाले नाही. त्यांचे अकुशलचे पैसे जमा करत असताना ५ मजूर चा मस्टर सादर केला. त्यातील १ मजुर चे पैसे एफ टी ओ न केल्याने आजही प्रलंबित आहे. बापू पांडुरंग लगड़ यांचे प्रकरणमध्ये तर अकुशलचे फक्त १ मजूराचे पैसे जमा आहेत. ९ मजूरांचा मस्टर दिला असताना ऑनलाइन ला फक्त ३ मजुर दिसत आहेत.वरील प्रकरणे फक्त तीन शेतकऱ्यांसाठी मर्यादित नसून तालुक्यातील अनेक शेतकरी अधिकारी वर्गाच्या निष्क्रियतेमुळे लाभापासून वंचित आहेत अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे कोळगाव येथील वरील तीन शेतकरी पंचायत समिती समोर दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी उपोषणास बसणार आहेत.

सदर प्रकरणाची माहिती, पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल, खासदार सुजयदादा विखे, माजी आमदार राहुलदादा जगताप, आमदार बबनराव पाचपुते, घनश्याम अण्णा शेलार, माजी सभापती पुरुषोत्तम भैय्या लगड़, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष नितिन अण्णा नलगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे अशी माहिती नितीन लगड यांनी दिली आहे.
स्त्रोत:(महेशकुमार शिंदे)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
24.5 ° C
24.5 °
24.5 °
81 %
7.4kmh
100 %
Sun
26 °
Mon
27 °
Tue
25 °
Wed
25 °
Thu
28 °
error: Content is protected !!