टीम लोकक्रांती : आष्टी प्रतिनिधी दि.१६ ऑक्टोबर २०२२ : आष्टी,पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील जादा प्रमाणातील पावसाने झालेल्या पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान बाधित म्हणून नोंद करावी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऊस सोडता सोयाबीन, उडीद, तूर व कापूस हे पिके भुईसपाट होऊन पाण्यात गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून दिलासा देणे आवश्यक आहे.अशी मागणी आ.सुरेश धस यांनी बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडे केली आहे.
- आ.सुरेश धस यांनी पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी येथे अतिवृष्टी झालेल्या पिकाची रविवारी पाहणी केली.सोबत जि.प.सदस्य प्रकाश कवठेकर, अशोक सुपेकर आणि ग्रामस्थ फोटो मध्ये दिसत आहेत.
परतीच्या पावसामुळे आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेल्या सगळ्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. आष्टी तालुक्यामध्ये आष्टी आणि आष्टा (ह.ना.) या दोन मंडळांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.. शेतात उभे असणारी तूर वेचणीला आलेला कापूस आणि सोयाबीन काढून तयार करता न आल्यामुळे तसेच बाजरी या पिकाचे देखील नुकसान झाल्याचे दिसून येत आहे विशेषतः पाटोदा तालुक्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे सर्व मंडळात पिकांचे नुकसान झालेले आहे तिथे सर्व काही नष्ट झालेले दिसून येत आहे. शिरूर तालुक्यात देखील सर्व पिकांची परिस्थिती अशीच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आष्टी, पाटोदा आणि शिरूर(का) तालुक्यातील.. पर्जन्यमापकावरील पावसाच्या नोंदी बाबत वस्तू निष्ठता लक्षात येत नाही.
त्यामुळे त्यावर अवलंबून न राहता ऊस लागवड केलेले क्षेत्र वगळून उर्वरीत सर्व पिकांचे सरसकट बाधित क्षेत्र म्हणून नोंदणी करून शासनाकडे सादर करावे जेणेकरून नुकसान भरपाई म्हणून शासकीय अर्थ साहाय्य उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि शेतकऱ्यांना दिवाळीचा सण समाधानकारक साजरा करता येईल यासाठी सरसकट पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी आ.धस यांनी केली आहे.
स्त्रोत:(प्रवीण पोकळे)