रयत बँकेत रयत मित्रमंडळाचा दणदणीत विजय; अकरा विरुद्ध सहा अशी दिली धोबीपछाड!!

टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी दि.१९ ऑक्टोबर २०२२ : दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा ची २०२२ ते २७ पंचवार्षिक निवडणूक मध्ये रयत सेवक मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य रयत सेवकांनी अकरा जागांवर दणदणीत यश दिनांक १९ रोजी झालेल्या मतमोजणीत मिळवले आहे. तर रयत सेवक संघाला सहा जागा मिळाल्या .समोर रयत सेवक संघ व स्वाभिमानी कल्याण मंडळ असे दोन दिग्गज पॅनल असतानाही नवख्या उमेदवारासह गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रयत सेवकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या बँकेची निवडणूक एक हाती जिंकून बाजी मारली आहे.

  • येणाऱ्या काळात रयत बँक कारभार नूतन संचालक मंडळ कशा पद्धतीने करणार आहे हा उत्सुकतेचा विषय आहे तर डिव्हीडंट व इतर खर्चाला कात्री देऊन सभासदांचे हित किती प्रमाणात रयत मंडळ संचालक मंडळ पाहणार आहे याकडे सर्व रयतसेवकांचे डोळे लागले आहे.

चार महिन्यापासून निवडणूक कार्यक्रम लागलेला असताना, मध्येच स्थगिती मिळूनही रयत सेवक मित्रमंडळाने प्रचारामध्ये कुठेही ढिलाई न देता प्रत्येक शाखेमध्ये पोहोचून आपली प्रचार यंत्रणा राबविली. कुठलाही डामडौल नाही, खर्च नाही, कसलेही आमिष दाखविले गेले नाही, प्रलोभने नाही, आहे ती वस्तुस्थिती सभासदांपुढे मांडून, स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल व येणाऱ्या काळामध्ये रयत बँके मध्ये सभासदांचीच मालकीची ठेवायची असेल तर रयत सेवक मित्र मंडळाला निवडून द्या अशी आग्रही भूमिका रयत सेवक मंडळाच्या सर्व उमेदवारांनी घेतल्याने रयत सेवकांनी मतांचे भरभरून दान मित्रमंडळाला दिले. त्यामुळे रयत सेवक मित्रमंडळाने रयत बँकेत मोठी उलथापालथ केली आहे.

सेवक मित्र मंडळाला यापूर्वी वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी त्या वेळेचे बोलगे सर,स्व. रामनाथ काळे, संभाजीराव देसाई, स्व. तुकाराम दरेकर व इतर कार्यकर्त्यांमुळे यश मिळाले होते. त्यानंतर प्रथमच गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी तळमळीने भूमिका मांडून तसेच रयत सेवकांच्या जिव्हाळ्याचा बदलीचा प्रश्न वेळोवेळी जाहीर भूमिका घेऊन मांडल्याने व रयत बँकेमध्ये चाललेल्या अनागोंदी कारभाराची सत्य परिस्थिती रयतसेवकांसमोर विशद केल्याने मित्रमंडळाला हे यश प्राप्त झाले आहे . हा विजय सर्वसामान्य रयत सेवकांचा आहे असे प्रतिपादन रयत सेवक मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केली .

रयत बँकेच्या या निवडणुकीमध्ये गायकवाड नंदकिशोर बबनराव ३४१३, भोये दीपक यशवंत २८७८, देसाई विक्रमसिंह तानाजीराव २७५५, कोलते अशोक बबन २७९४, चव्हाण संदीप निवृत्ती २७०३, केदार श्रीराम सभाकर २८८७, शिर्के राजेंद्र संपतराव २७२४, खामकर प्रशांत जालिंदर ३०२१, झरेकर अशोक किसन २९३६, पाटील जयराम आत्माराम २८७५ , तिटकारे सुरेश धोंडू २७४० , पाटील किशोर सुरेश ३९४२, बाळसराफ जोस्ना सारंग २८३४, काटकर शोभा विष्णू २७७२, डहाळे दिलीप एकनाथ २८३५, तुपे दिलीप दशरथ २८८३, डॉ. कच्छवे धनंजय श्रीमंतराव ३००० इत्यादींचा समावेश आहे.
या विजय उमेदवारांमध्ये रयत सेवक संघाचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. रयत सेवक संघाचे सचिव अनिल खरात यांचा दिलीप तुपे यांनी काही थोडक्या मताने पराभव केला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील प्रशांत खामकर व दिलीप तुपे यांनी यश मिळवल्याने रयत सेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
स्त्रोत:(माहेशकुमार शिंदे)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
22.7 ° C
22.7 °
22.7 °
89 %
5.2kmh
100 %
Wed
23 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
27 °
error: Content is protected !!