टीम लोकक्रांती : लिंपणगाव प्रतिनिधी दि.१९ ऑक्टोबर २०२२ : राज्य सरकारने राज्यातील पावसाचे अतिप्रमाण लक्षात घेता त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील पाऊस थांबता थांबेना त्यामुळे खरीप हंगामातील पिके ऊस इत्यादींचे पंचनामे न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करावी मागणी जिल्हा बँकेच्या संचालिका तथा महिला काँग्रेसचे अध्यक्ष सौ अनुराधाताई नागवडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना सौ नागवडे पुढे म्हणाल्या की ,मी देखील शेतकऱ्यांची मुलगी आहे म्हणून बोलते व्यथा मांडते. मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची पूर्ण जाणीव आहे .ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या भावना अधिक तीव्र आहेत. तालुक्यात ओला दुष्काळ जाणवतोय. खरीप हंगामा सह ऊस पिकामध्ये आद्यपही पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचनामे न करता थेट शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, असे सांगून सौ नागवडे पुढे म्हणाल्या की, श्रीगोंदा तालुक्यात तुर, कापूस, बाजरी, उडीद इत्यादी कडधान्य सह अन्य पिकांचे हाता तोंडाशी आलेले असताना मोठे नुकसान झाले आहे .हे नुकसान भरून न येण्यासारखे आहे. शेतकरी अत्यंत मोठ्या तणावाखाली आहे.श्रीगोंदा तालुका हा ७२ टक्के सिंचन क्षेत्रात मोडतो .परंतु चालू वर्षी पावसाने मोठा आहाकार सुरू केल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामध्ये तालुक्यात ७२ टक्के सिंचन क्षेत्र लक्षात घेता ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. ऊस लागवडीसाठी एकरी जवळपास ४० हजार रुपये ऊस खर्च येतो. परंतु सध्या त्या ऊसामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने गळीत हंगामाला जाणारा तो देखील ऊस पाण्यात उभा आहे .त्यामुळे ऊस उत्पादकांसमोर देखील मोठे संकट उभे राहिले आहे.
असे सांगून यापुढे सौ नागवडे आणखी म्हणाल्या की, शेतीला जोडधंदा म्हणून तालुक्यातील शेतकरी दूध धंदा करत असताना चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. त्याचा परिणाम दूध धंद्यावर देखील येऊन ठेपला आहे. चालू वर्षी शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे संकट पाहता आमचे नागवडे कुटुंब देखील दिवाळी अत्यंत साध्या पद्धतीने म्हणजे दिवे लावून साजरी करणार आहोत. श्रीगोंदा तालुक्यातील अति पर्जन्यमान पाहता राज्य सरकारने हेक्टरी ७५ हजार रुपयाची मदत करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या वतीने मी करणार आहे .उसाचे क्षेत्र नगदी पीक म्हणून आपण सर्वजण पाहतो .हे क्षेत्र देखील अतिपावसाने बाधित झालेले आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर पुढील दोन वर्ष या ऊस क्षेत्रावर मोठा दुर्गामी परिणाम होणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या या भावनांचा विचार न केल्यास प्रसंगी तीव्र आंदोलन छेडणार आहोत. तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्याच्या सत्तेत आमदार म्हणून आहेत. त्यांना आमदारकीचा प्रदीर्घ अनुभव आहे .निश्चित पणे ते शेतकऱ्यांच्या भावना राज्य शासनापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत कशी मिळेल याकडे ते निश्चित शासनाचे लक्ष वेधतील .असे सांगून सौ नागवडे पुढे म्हणाल्या की, दोन दिवसात राज्याचे मुख्यमंत्र्यांना तालुक्यातील ओल्या दुष्काळा संदर्भात समक्ष भेटून निवेदन देणार आहोत .नागवडे कुटुंब हे संकटकाळी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभे राहून मदत करत आहोत. आताही शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेले असमानी संकट ओला दुष्काळ पाहता सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून ऊस उत्पादक सभासद सर्वसामान्य शेतकरी यांना न्याय कसा मिळेल यासाठी आपण शासन दरबारी प्रामाणिकपणे पाठपुरावा करणार आहोत. असे सौ नागवडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
या आयोजित पत्रकार परिषदेस तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे, वांगदरीचे सरपंच आदेश शेठ नागवडे, कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर, मढेवडगाव सेवा संस्थेचे चेअरमन प्रमोद शिंदे ,माजी संचालक योगेश भोईटे आदी यावेळी उपस्थित होते.
स्त्रोत:(नंदकुमार कुरुमकर)