टीम लोकक्रांती : मुंबई दि २० ऑक्टोबर २०२२ : दि २० ऑक्टोबर रोजी मुंबई महाराष्ट्रगड पक्ष कार्यालय येथे मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पुणे जिल्हा संघटक पदी माधव जयशिंग दांगडे यांची निवड करण्यात अली.सदरील नियुक्तीपत्र महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संजयभाई नाईक यांच्या हस्ते देण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माधव दांगडे यांच्या वरती मोठी जबाबदारी टाकलेली आहे ही जबाबदारी योग्य पार पाडणार व संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असं यावेळी मनसे वाहतूक सेनेचे नवनिर्वाचित पुणे जिल्हा संघटक माधव दांगडे यांनी सांगितले.
यावेळी आरिफ शेख सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य आणि प्रवीण पाथरे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य व सचिन कोरे अध्यक्ष पुणे शहर उपस्थित होते.
या निवडीबद्दल माधव दांगडे यांच्या वरती सर्व स्तरांमधून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
स्त्रोत:(नियुक्तीपत्र)