टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२१ ऑक्टोबर २०२२ : परतीच्या पावसाने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेला आहे त्यातच श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे सर्व पिके पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कोळगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते .
सतत पडत असलेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील कापूस, कांदा, सोयाबीन, तूर मूग, उडीद तसेच फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनाम्याची वाट न पाहता ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना एकरी ५०,००० मदत जाहिर करावी व पिक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी,तसेच शेतकऱ्यांचे जुन २०२२ पासून चे वीजबील माफ करावे, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीच्या वतीने कोळगाव येथेरस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय घनःश्याम आण्णा शेलार,महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे अध्यक्ष मा.बाळासाहेब नाहटा , श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघाचे माजीआमदार तथा जिल्हा बँक संचालक राहुल दादा जगताप पाटील,हेमंत सर नलगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरिदास आबा शिर्के कोळगाव पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.यावेळी प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले.
सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता लवकरात लवकर सरकारने शेतकऱ्यांना सरसकट एकरी रुपये ५०,००० रुपये मदत द्यावी ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली.
स्त्रोत:(आप्पा चव्हाण)