टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२२ ऑक्टोबर २०२२ : श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी ची फसवणूक करणाऱ्या कर्जदार आणि जामीनदार सह सह कर्जदार यांना बनावट कागदपत्रे बनवल्या प्रकरणातील गुन्ह्यात अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
श्रीगोंदा शहरात असणाऱ्या श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी, शाखा-आहे या शाखेतून २०१५ साली कर्ज घेताना २०१० सालीच विक्री केलेली जमीनीची बनावट कागदपत्र, सात बारा उतारा करून तसेच बनावट फेरफार दाखवून व्यवसायासाठी कर्ज घेण्यात आले.घेतलेले कर्ज परतफेड न करता श्रीराम फायनान्स कंपनीची चार लाख रुपयांची फसवणूक कर्जदारांनी केली. तसेच बनावट सातबारा उतारे, बनावट सही शिक्के तयार केल्याप्रकरणी गुन्हा कर्जत तालुक्यातील संभाजी शिवाजी सूर्यवंशी, ईश्वर शिवाजी सूर्यवंशी तसेच मुकेश दादासाहेब सूर्यवंशी यांच्या विरोधात दाखल करण्यात आला होता.
बँकेची फसवणूक केल्या प्रकरणात श्रीगोंदा पोलीसानी तीन जणांना ताब्यात घेतले होते. श्रीगोंदा ब न्यायालयासमोर हजर केले असता या सर्वांची तीन दिवस पोलीस कस्टडी मध्ये रवानगी केली . त्यानंतर त्यांनी जामीनसाठी अर्ज केला होता मात्र गुन्ह्याचा गंभीरपणा, तसेच गुन्हेगारी वर्तणूक पाहून . न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी कंपनीच्या वतीने ॲड. रोहित गायकवाड आणि ॲड. नाना मचाले यांनी काम पाहिले.
स्त्रोत:(न्यायालयीन आदेश)