टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२२ ऑक्टोबर २०२२ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन चेस क्रीडा स्पर्धेत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचा एफ.वाय.बी.बी.ए. चा विद्यार्थी शुभम बाळेश्वर गुंड याची पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या आंतर विभागीय चेस क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.तसेच प्रतिक शेळके, विराज शिंदे व सोहम शिंदे यांनी अंतिम फेरी पर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, महाविद्यालय विकास समिती सदस्य माजी आमदार राहुल दादा जगताप, महावीर पटवा, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सीनियर विभागाचे उपप्राचार्य डॉ. महादेव जरे, ज्यूनियर कॉलेज उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जिमखाना प्रमुख प्रा.संजय अहिवळे, शा. शि. संचालिका प्रा. बागुल कल्पना, क्रीडा शिक्षक संजय डफळ, संतोष जाधव यांनी मार्गदर्शन केले.
स्त्रोत:(आप्पा चव्हाण)