टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२२ ऑक्टोबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड या गावचे सरपंच विकास इंगळे यांनी स्वखर्चातून प्रत्येक कुटुंबास पाच किलो साखरेचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.
उच्चशिक्षित व आयटी क्षेत्रात असणारे पिसोरेखांड गावचे सरपंच विकास इंगळे हे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गराजू विद्यार्थी व शाळेला भेट स्वरूपात कायम मदत करत असतात.
- राजकारण कमी पण समाजकारण जास्त करण्याचा त्यांचा उद्देश असून गावातील अनेक सामाजिक कार्यक्रमात ते अग्रस्थानी असतात.
या साखरवाटप प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप आले असता त्यांनी सांगितले की विकास इंगळे यांनी राबवलेला हा उपक्रम स्तुत्य असून प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मी प्रयत्न करणार असून प्रत्येक गावकऱ्यांनी देखील अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच अविनाश ओहळ, सर्व सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्त्रोत:(आप्पा चव्हाण)