टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२४ ऑक्टोबर २०२२ : सर्वसामान्यांची दिवाळी ही गोड व्हावी याकरता राज्यसरकारच्या वतीने यंदा देण्यात येणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ च्या वितरणाला २३ ऑक्टोबर रोजी ढवळगाव मधे निळकंठेश्वर महिला स्वंयमसंचलित बचत गट अंतर्गत सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिधा वाटपाची सुरुवात करण्यात आली.
अनेक गावांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करताना दिरंगाई होत आहे.परंतु या गोष्टीला ढवळगाव अपवाद ठरले आहे.स्वस्त धान्य दुकान संचालिका सौ.नंदा शिंदे यांनी योग्य नियोजन करत सर्व लाभधारकाला आव्हान कले होते आव्हानाला प्रतिसाद देत ३४८ लाभधारकांनी पैकी ८०% आनंदाचा शिधाचा लाभधारकांनी पहिल्याच दिवशी लाभ घेतला.
ग्रामपंचायत सदस्य प्रतिक्षा शिंदे, मा.उपसरपंच रवींद्र शिंदे,मा.सरपंच विजय शिंदे,ग्रा.सदस्य राहुल बोरगे,ग्रा.सदस्य बाळासाहेब शिंदे,आप्पा ढवळे,मा.ग्रा.सदस्य अमोल बोरगे,पांडुरंग ढवळे,सुरेश गुंड,बिबन पठाण,पत्रकार पंकज गणविर व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते.
स्त्रोत:(आप्पा चव्हाण)