टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२४ ऑक्टोबर २०२२ : राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.गेल्या आठवड्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हाण व परिसरामध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे सोयाबीन,कांदा,तुर,इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिके पाण्या खाली गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे त्यामुळे सरकारने सकट मदत जाहीर करून ती देण्यात यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
दिनांक २३ ऑक्टोबर रोजी कृषी अधिकारी हिरवे मॅडम,तलाठी प्रशांत काळे, सरपंच संगीता संजय मगर, उपसरपंच संजय साळवे,संजय हरिभाऊ मगर, युवराज भुजंग इथापे, बाळासाहेब वाळके, अलका इथापे,यधु पवार,राघु ईथापे इत्यादी ग्रामस्थ व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
स्त्रोत:(आप्पा चव्हाण)