टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२६ ऑक्टोबर २०२२ : श्रीगोंदा तालुका प्रहार अपंग संघटनेचे वतीने अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी अंध व्यक्ती बाळू ससाने यांना दिवाळीचा फराळ व कपडे देऊन सन्मानित करण्यात आलं ज्याला नाही कुणी त्याला आम्ही या मनिप्रमाणे आज श्रीगोंदा शहरांमध्ये नगरपालिका हद्दीमध्ये अंध दिव्यांग बाळू ससाने यांच्या घरी जाऊन कपडे व दिवाळीचा फराळ दिला.
आजच्या युगामध्ये माणूस हा खूपच निष्ठूर बनला आहे त्यामुळे कोणीही कोणास मदत करत नाही अशा परिस्थितीमध्ये असं समाजकार्य करणे हे समाजासाठी आदर्शवत आहे त्यामुळे प्रहार अपंग संघटना चांगले उपक्रम नेहमीच राबवत असते आणि हा ही उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे त्यांचे लोकांमधून कौतुक होत आहे.
यावेळी अपंग संघटना तालुका उपाध्यक्ष सुरेश गलांडे, शहराध्यक्ष सचिन तोडकर, उपाध्यक्ष गोरख रासकर, रामभाऊ पाचपुते, बापू रंधवे, वैभव हराळ ,सतीश वराडे, संतोष जाधव, बाबा घोडके, शहर संघटक गणेश कळसकर, अमोल भागवत, शाम हिगसे ,सुनील उदमले ,नारायण क्षीरसागर, घोडके, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्त्रोत:(आप्पा चव्हाण)