श्री.संत शेख महंमद महाराज मंदिर बारवेवर दीपोत्सव; महाराष्ट्र बारव मोहिम अंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचा उपक्रम..!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि. २७ ऑक्टोबर २०२२ : श्रीगोंदा नगरीचा इतिहास मोठा गौरवशाली आहे.दक्षिण काशी म्हणून ओळख आहे. पंढरीच्या पांडुरंगाशी थेट नाते सांगणारी ही पवित्रभूमी. भारतातील पवित्र सरस्वती नदीचा सहवास इथे श्रीगोंदेकरांना लाभला आहे.प्राचिन राजमार्गाच्या पाऊलखुणा आजही दिमाखात उभ्या आहेत. बारव या त्यापैकीच पाऊलखुणा आहेत. पुर्वीच्या काळी श्रीगोंदयामध्ये जलव्यवस्थापन अप्रतिम होते. श्रीगोंदे तालुक्यात १०० च्या वर बारवा, दगडी पायविहिरी अस्तित्वात होत्या. त्यातील एक‌ अप्रतीम तीन मजली बारव. श्री.संत शेख महंमद महाराज मंदिर श्रीगोंदा.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी श्री संत शेख महंमद महाराज यांच्या नित्य वापरासाठी ही बारव १५९६ साली बांधून घेतली आहे.४०६ वर्षापुर्वीची बारव.
श्रीगोंदे तालुक्यातील या सर्व बारवा आपल्या पूर्वजांचे वैभव, परंपरा संस्कृती आणि वारसा सांगत आहेत. इथे इतिहास घडला आहे. शेकडो वर्षांपासून अनेकांची तहान या बारवांनी शमविली आहे. जीवंत पाण्याचा स्रोत असलेल्या या बारवा आहेत.या बारवांचे जतन करण्यासाठी स्वच्छता करून पूर्वीप्रमाणे संवर्धन करण्याचा प्रयत्न रोहन काळे यांचे साथीने “महाराष्ट्र बारव मोहिम” अंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवार करत आहे.

महाराष्ट्रातील हिंदू-मुस्लिम एकोपा जपणारी महान विभुती श्री.संत शेख महंमद महाराज मंदिर परिसरातील तीन मजली बारव दिवाळी पाडव्याला १४०६ दिव्यांनी उजळुन निघाली.
आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला युगायुगांचा अलौकिक वारसा मातीच्या दिव्यांनी उजळुन निघाला.

श्रीगोंदा तालुका पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, यांचे हस्ते दीपप्रज्वलन व बारव पाण्याचे जलपूजन करण्यात आले. शेख महंमद महाराजांचे वंशज पत्रकार अमीन शेख, राजु शेख, यात्रा कमिटी अध्यक्ष गोपाळराव मोटे पाटिल.शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे,उपाध्यक्ष, डॉ. चन्द्रशेखर कळमकर, सचिव, सोमेश शिंदे ,संपर्कप्रमुख, महीला रणरागिणी, बालमावळे,यांचेसह शिवदूर्ग परिवाराचे ५० स्वयंसेवक मावळे उपस्थित होते.शेकडो श्रीगोंदेकरांनी उपस्थित राहून हा नयनरम्य सोहळा अनुभवला.

शिवदुर्गच्या वतीने २५ वा बारव दिपोत्सव! नजरेआड गेलेला वारसा पुन्हा नव्याने उजेडात यावा म्हणून शिवदुर्ग परिवार बाराव दिपोत्सव साजरा करत आहे. श्रीगोंद्यातील सर्व बारवा टप्प्याटप्प्याने शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवार तरुणाईला सोबत घेवुन लोकसहभागातून संवर्धित करणार आहे.आपला ऐतिहासिक वारसा आपण जतन करूया असे उदगार शिवदुर्ग संचालक संकेत नलगे यांनी व्यक्त केले. दीपोत्सवची रांगोळी प्रतीभा इथापे, कपिल उल्हारे यांनी काढली.

मारूती वागसकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. उपस्थितांचे आभार संचालिका संगीता इंगळे यांनी व्यक्त केले.यावेळी स्वयंसेवक म्हणून शिवदुर्गच्या पुरुष व महिला रणरागिणी यांनी आपले योगदान दिले.

पत्रकार गणेश कविटकर, सुहास कुलकर्णी, नितीन शेळके, संकेत लगड, रोहिणी शेळके, अक्षीका इंगळे, नितीन घालमे, नीरज पाडळे, अजित लांडगे, मिठू लंके, अमोल बडे, गोरख कडूस, हेमंत काकडे, मारूती साळवे, सुषमा साळवे, भूषण काकडे, मनेश जठार,यांसह अनेक नागरिक उपस्थीत होते.
स्त्रोत:(शिवदुर्ग ट्रेकर्स)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25 ° C
25 °
25 °
70 %
7kmh
100 %
Tue
25 °
Wed
28 °
Thu
25 °
Fri
27 °
Sat
23 °
error: Content is protected !!